Apple Chutney : साहित्य :
1 किलो मोठी आंबट सफरचंदे, 300 ग्रॅम गूळ, 2 मोठे चमचे बेदाणे (थोडे कमी चालतील), 2 मोठे चमचे मीठ, 325 मिली व्हिनेगर, 4-5 लाल सुक्या मिरच्या, अर्धा चमचा मोहरी, 2 मोठे चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा किसलेली लिंबाची साल, 1 कांदा, 6 लसूण पाकळ्या, 4 तमालपात्र, 2 चमचे सुंठपूड, अर्धा चमचा लाल तिखट.
संबंधित बातम्या
कृती :
सफरचंदाची साल, बिया आणि गाभा काढून गर किसावा. लाल मिरच्या थोड्या व्हिनेगरमध्ये भिजत ठेवाव्या. कांदा आणि लसूण बारीक करून घ्यावा. सफरचंदाचा किस, मिरच्या (व्हिनेगरसह), तिखट, मोहरी, गूळ, लिंबाची साल, सुंठपूड आणि तमालपत्रे एका मोठ्या पातेल्यात एकत्र करून गॅसवर ठेवावे. झाकण असू द्यावे, पण अधूनमधून ढवळत राहावे.
मिश्रण मऊसर शिजले की उरलेले पदार्थ त्यात घालावेत. मंद आचेवर उकळून द्यावे, मधून ढवळावे. बुडाला लागू देऊ नये. चटणी जॅमसाखी दाट झाली व पृष्ठभाग चकचकीत दिसू लागला की खाली उतरवावी. लगेच तमालपत्रे काढून टाकावीत. स्वच्छ बरणीमध्ये ही चटणी झाकण लावून ठेवावी. ( Apple Chutney )