घरी बनवा पनीर-रवा लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी | पुढारी

घरी बनवा पनीर-रवा लाडू, जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य :

1 किलो पनीर, 2 चमचे साखर, 200 गॅ्रम नारळ किसलेले, 1 कप दूध, 1/2 चमचा वेलचीपूड, केशर काड्या आणि गुलाबपाणी, सुका मेवा बारीक काप केलेले.

कृती :

सर्वप्रथम पनीर आणि साखर चांगल्या प्रकारे मॅश करून त्या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत परतूून घ्यावे. थंड झाल्यावर त्यात वेलचीपूड आणि केशर काड्या टाकाव्यात. एका कढईत दूध आणि किसलेले नारळ घालावे. त्यात 2 चमचे साखर टाकावी, या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत शिजवावे. या मिश्रणाला थंड करून त्याचे 10-12 लहान लहान गोळे तयार करावे.

तसेच पनीरच्या मिश्रणाचेसुद्धा 10-12 गोळे तयार करावे. पनीरचे गोळे घेऊन हातावर फैलवून त्यात मधोमध नारळाची गोळी ठेवून सावधगिरीने बंद करून लाडू बनवून घ्यावे. सर्व्हिंग प्लेटमध्ये हे लाडू ठेवून त्यावर गुलाबपाणी शिंपडावे. छान गंध येतो.

Back to top button