Diwali Lakshmi Pujan Prasad : स्पेशल खीरीचा नैवेद्य खास लक्ष्मी पूजनासाठी | पुढारी

Diwali Lakshmi Pujan Prasad : स्पेशल खीरीचा नैवेद्य खास लक्ष्मी पूजनासाठी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दसऱ्याची लगबग संपली आणि नुकतेच सर्वाच्या आवडीचा सण म्हणजे, दिवाळीच्या धामधूमीला सुरूवात झाली. यंदाच्या दिवाळी लहानापासून ते मोठ्यापर्यत सर्वजण आनंदात साजरी करत आहेत. मग ते दिवाळीत कपड्याच्या खरेदीपासून ते खाण्याच्या पदार्थापर्यत. यासोबत खऱ्या अर्थाने दिवाळीत लाडू, चिवड, करंजी, चकली, शंकरपाळी, कापण्या, शेव, अनारसे, भाकरवडी अशा अनेक पदार्थाची मेजवाणीच असते. परंतु, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कमी वेळेत कोणता गोडाचा पदार्थ देवीच्या नैवेद्याला बनवावा असा प्रश्न महिला वर्गाला पडतो. अशा वेळी कमी वेळेत आणि पटकन बनणारा स्पेशल साजूक तुपातील शेवयाची खीरीचा बेत आखावा. चला तर मग पाहूयात ही रेसीपी कशी बनवायची. ( Diwali Lakshmi Pujan Prasad )

आहारात सुका मेव्याचा वापर खूप लाभदायक आहे. सुका मेव्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन, पोषक तत्वे, खनिजे आणि स्निग्ध पदार्थ असतात. मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि पोषक तत्वे असतात, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. सुका मेव्यात ऑर्गेनिक ॲसिड, एमीनो ॲसिड आणि ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि सेलेनियम, मॅग्नेशियम, झिंक, कॅल्शियम आणि फास्फॉरससह फायबर मोठ्या प्रमाणात असतात. ( Diwali Lakshmi Puja Prasad )

No Image

Recipe By अनुराधा कोरवी

Course: गोड पदार्थ Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपं

Servings

१५ minutes

Preparing Time

१० minutes

Cooking Time

१० minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. शेवया

  2. फुल फॅट दूध

  3. साजूक तूप

  4. साखर

  5. वेलदोडे

  6. काजू

  7. पिस्ता

  8. बदाम

  9. चारोळे

  10. मणुके

  11. आक्रोड

DIRECTION

  1. सुरूवातीला दूध तापवून घ्यावे.

  2. त्याआधी बदाम, चारोळे पाण्यात भिजवत घालावे.

  3. नंतर बदाम, चारोळे पाण्यातून काढून बारीक तुकडे करून घ्यावेत.

  4. आक्रोड, पिस्ता आणि काजूचे बारीक काप करून घ्यावेत.

  5. वेलदोडे भाजून घेऊन त्याची पूड करावी.

  6. गॅस मंद आचेवर ठेवून कढई किंवा पातेलं ठेवावे.

  7. त्यात दोन चमचे साजूक तूप घालावे.

  8. तूप पातळ होऊ द्या. त्यात शेवया भाजून घ्या.

  9. शेवया बाजूला ठेवून द्या.

  10. त्याचच दूध ओतून उकळ काढावी.

  11. त्यात गोडीनुसार साखर आणि शेवया घालाव्यात.

  12. वरून वेलदोडे पूड घालावे.

  13. आता सर्व सुका मेवा घालून हळूहळू दूध ढवळत राहावे.

  14. खीर १० मिनिटे शिजू द्यावी.

  15. गॅस बंद करून खीरीचे पातेलं उतरून ठेवावे.

NOTES

    Back to top button