आजचे राशिभविष्य (दि.११ जुलै २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि.११ जुलै २०२३)

मेष ः पैशांबाबत इतके गंभीर होऊ नका की, आपल्या नात्यालाच खराब कराल. तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमची मुले सर्वतोपरीने प्रयत्न करतील.

वृषभ ः आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबाला आनंद होईल.

मिथुन ः आपला संयम ढळू देऊ नका. विशेषत: कठीण समयी नियंत्रण ठेवा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल.

कर्क ः शारीरिक तसेच मानसिकद़ृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल. थोडा आराम करा आणि सात्विक अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल.

सिंह ः दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने आनंदीत व्हाल. एकाच जागी उभं राहूनही प्रेम तुम्हाला एका वेगळ्या जगात घेऊन जाईल.

कन्या ः तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा. यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो.

तूळ ः प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. तुमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमची विशेष दखल घेतली जाईल.

वृश्चिक ः आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल.

धनु ः भविष्यातील काही योजनांचे बेत आखाल. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील.

मकर ः आपल्या मुलांच्या कामाचा तुम्हाला अपरिमित आनंद होईल. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतवणूक करू नका.

कुंभ ः घरातील ताणतणावामुळे तुम्ही चिडचिड कराल. हे तणाव दडपण्याचा प्रयत्न केलात, तर त्यामुळे शारीरिक समस्या वाढतील. म्हणून त्यावर मात करा.

मीन ः एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल.

– ज्यो. मंगेश महाडिक 

Back to top button