आजचे राशिभविष्‍य (दि. १० जून २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्‍य (दि. १० जून २०२३)

मेष ः वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे आपल्या सहिष्णुतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच तसेच विचार शक्तीला धक्का लागू शकतो.

वृषभ ः तुमच्या इच्छा प्रत्यक्षात येण्यासाठी तुमचे विचार आणि ऊर्जा वापरा. केवळ कल्पनाविश्वात रमण्यात काहीही अर्थ नाही. वास्तवाचे भान हवे.

मिथुन ः आज शांत राहिल्याने तणावमुक्त राहाल. उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो.

कर्क ः तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा.

सिंह ः आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन दिवस अशा जागेत घालवणे पसंत कराल, जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल.

कन्या ः विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहे, त्याच्याबाबतीत गुरुजनांसोबत बोलू शकता. गुरूंचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजण्यात उपयुक्त ठरेल.

तूळ ः आर्थिक हानी होईल. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते.

वृश्चिक ः तुमची स्थिती काय आहे, हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. प्रवासाच्या संधी शोधाल.

धनु ः प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे मनोधैर्य उंचावेल. बँकेसंदर्भातील व्यवहार काळजीपूर्वक हाताळा. कुटुंबातील सदस्य प्रेमाने काळजी करतील.

मकर ः प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमच्यासारख्याच समान आवडी-निवडी असलेल्या व्यक्तींसोबत तुमची भेट घडेल.

कुंभ ः जोडीदारासमवेत बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल. मुलांसोबत वेळ व्यतीत करून आरामदायी क्षण अनुभवाल.

मीन ः इतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु, तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत, तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button