आजचे राशिभविष्‍य : (दि. ९ जून २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्‍य : (दि. ९ जून २०२३)

मेष ः आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षांना धक्का लागण्याची शक्यता. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज.

वृषभ ः आराम करण्याची गरज आणि आवडते छंद जोपासा. माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल.

मिथुन ः मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध राहा. तुमच्या नियमित कष्टांचे चांगले चीज होईल. आर्थिक आवक चांगली राहील.

कर्क ः रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी आवडते काम केले पाहिजे. यामुळे तुमच्यात सकारात्मक बदल होतील.

सिंह ः आजचा दिवस सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल.

कन्या ः तुम्हाला आनंद देतील, अशा गोष्टी करा; पण इतरांच्या कामापासून दूर राहा. कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे दिवस अस्वस्थतेत जाईल.

तूळ ः थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा, नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल.

वृश्चिक ः महत्त्वाचे जमीनविषयक व्यवहार आणि करमणुकीच्या कार्यक्रमातील अनेक लोकांचे समन्वय साधण्यासाठी सध्याची स्थिती उत्तम.

धनु ः तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम मानसिक समाधान मिळवून देईल. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल.

मकर ः तुमच्यावर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे, अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. मालमत्ताविषयक कामे होतील.

कुंभ ः व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची शक्यता. आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे आकर्षण वाटू शकते.

मीन ः आज रिकाम्या वेळेत अध्यात्मिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बर्‍याच समस्या दूर होऊ शकतात.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button