[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष : विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना थोडा आराम करा. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ : घरगुती काळजी बेचैन करेल. धन कुठे खर्च होत आहे यावर नजर ठेवण्याची गरज. आगामी काळात समस्यांचा सामना करावा लागू शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मिथुन : भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा विचार करा. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने ज्ञानात भर पडेल. नवीन लोकांशी संपर्क होईल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क : आरामात राहण्याचा आनंद लुटू शकाल. आर्थिक रूपात बरेच मजबूत असाल. धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह : व्यावसायिकांनी व्यवसायाशी जोडलेल्या गोष्टी शेअर करू नका, असे केल्यास समस्यांचा सामना करावा लागू शकतो.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या : प्रेमाचा अनुभव घ्याल. मनातील विचार मांडण्यास कचरू नका. दिवस खूप सुंदर असल्याने जोडीदारासमवेत त्याचा आनंद लुटू शकता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ : वाहन चालविताना, विशेषकरून वळणावर काळजी घ्या, दुसर्यांचा निष्काळजीपणा तुमच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतो. मनावर ताबा ठेवा.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] वृश्चिक : प्रेम करणार्या व्यक्तीच्या निष्ठेवर शंका घेऊ नका. गेल्या काही दिवसांपासून कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण होत असतील, तर ते कमी होतील.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] धनु : कुटुंबाचे सगळे थकीत कर्ज फेडू शकाल. जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर : तुम्हाला मदतीचा हात देण्यास नातेवाईक तयारी दर्शवतील. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र/मैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] कुंभ : समाधानी आयुष्यासाठी मनाचा कणखरपणा सुधारा. तुम्हाला काही वाईट वार्ता मिळू शकते. ज्या कारणाने तुमचे मन दुःखी होऊ शकते.[/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""] मीन : कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. नफा झाल्याने चेहर्यावर आनंद आणू शकतो.[/box]
– ज्यो. मंगेश महाडिक