जाणून घ्या आजचे आजचे राशिभविष्य

जाणून घ्या आजचे आजचे राशिभविष्य
Published on
Updated on

मेष – धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभाग घ्याल, जुने आजार उद्भवतील, आत्मविश्वास महत्त्वाचा आहे, नियमांचे उल्लंघन नको, संयम आवश्यक.

वृषभ – उष्णतेचे विकार उद्भवण्याची संभावना आहे. जुन्या प्रॉपर्टीसंदर्भात माहिती मिळेल, वाद-विवादापासून दूर राहा, लोक काय म्हणतील याचा विचार न करता निर्णय घ्यावा, आत्मचिंतनाची गरज आहे.

मिथुन – अथक प्रयत्नांना यश मिळेल, प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल, सरकारसंबंधित प्रलंबित कामे पूर्ण होतील, भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल.

कर्क – उत्साहवर्धक वातावरण राहील, लोकसहकार्यातून कार्यसिद्धी होईल, यशाकडे वाटचाल कराल, नोकरी करणार्‍यांना आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

सिंह – नवी दिशा व धोरणांचा स्वीकार करावा लागेल, आळसामुळे नुकसान होण्याची शक्यता, दुसर्‍यावर विसंबून राहू नका.

कन्या – द्विधा मनःस्थिती होईल, कौटुंबिक वातावरण बिघडेल, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता, पित्ताचे विकार होण्याची शक्यता. संतुलित आहार महत्त्वाचा.

तूळ – भावंडांकडून सहकार्य लाभेल, आर्थिक प्रगती होईल, मित्रमंडळींचा सहवास लाभेल. गुंतवणूक करण्यासाठी उत्तम दिवस, कलागुणांना वाव मिळेल.

वृश्चिक – अवांतर बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. दिलेला शब्द पाळावा लागेल, कौटुंबिक वादविवादापासून दूर राहा, आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

धनु – महत्त्वाकांक्षी स्वभावामुळे कामांमध्ये यश मिळेल, आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी उपलब्ध होईल, आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल, प्रसन्नता प्राप्त होईल.

मकर – आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, आत्मविश्वास दृढ ठेवणे आवश्यक आहे, वस्तू हरवण्याची शक्यता आहे, देणेकरी त्रास देतील, संयमित राहणे महत्त्वाचे.

कुंभ – अनावश्यक खर्चावर नियंत्रण येईल, व्यावसायिक प्रगती होईल, विवाहविषयक आनंदाची बातमी ऐकायला मिळेल, प्रवासाचे योग संभवतात.

मीन – ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल, सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्याल, भावनिक प्रसंग निर्माण होतील, कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील, उत्तम आरोग्याचा दिवस.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news