मेष-वाद-विवादामधे यश मिळेल. आप्तस्वकियांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. आरोग्याच्या द़ृष्टीने अनुकूल दिवस. आपल्या इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. आर्थिक प्रगती होईल.
वृषभ-सतत कामामुळे आरोग्याच्या तक्रारी संभवतात. आरामाची गरज आहे. गुंतवणुकीसाठी अयोग्य दिवस. जुन्या गुंतवणुकीमध्ये नुकसान होण्याची शक्यता.
[
मिथुन
मिथुन-बुद्धिचातुर्याची आवश्यकता आहे. पेचप्रसंग निर्माण होतील. मनाविरुद्ध घटना घडतील. कौटुंबिक ताणतणाव निर्माण होईल. मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. आत्मपरीक्षण करण्याची गरज.
कर्क-आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. वाणीच्या प्रभावामुळे लोकानुकूलता मिळेल. मनासारख्या घटना घडतील. आवडत्या व्यक्तींचा सहवास लाभेल. कला, खेळात यश मिळेल.
सिंह-अनावश्यक बोलण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. कौटुंबिक स्वास्थ्य बिघडेल. अनावश्यक खर्च होईल. वस्तू सांभाळून ठेवा. हरवण्याची शक्यता आहे.
कन्या-सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या मित्रमंडळीची भेट होईल. आतिथ्यामध्ये दिवस जाईल. आप्तेष्टांबरोबर खरेदीचा आनंद घ्याल.
तूळ-वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. कोणालाही जामीन राहू नका. कशावरही डोळे झाकून सही करू नका. आर्थिक नुकसान व फसवणुकीची शक्यता आहे.
वृश्चिक-खर्याअर्थाने आनंददायी दिवस जाईल. व्रत-वैकल्यांचा दिवस. मानसिक समाधान देईल. आपापसातील मतभेद मिटतील. आर्थिक विकास होईल.
धनु-प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग घ्याल. ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन लाभेल.
मकर-आळस व परावलंबी वृत्तीमुळे मनःस्ताप होण्याची शक्यता. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. वेळेचे नियोजन आवश्यक आहे. प्रवासाचे योग.
कुंभ-कामांचा वेग मंदावेल. ठरवलेल्या कामांमध्ये अडचणी येतील. जवळच्या लोकांबरोबर मतभेद होतील. आरोग्याच्या द़ृष्टीने प्रतिकूल दिवस.
मीन-जोडीदाराची साथ लाभेल. कोर्ट-कचेरीच्या कामांना गती मिळेल. व्यावहारिक व व्यावसायिक प्रगती होईल. प्रेमभाव निर्माण होईल.