सरकारी नोकरी : कोस्टगार्ड, नाबार्डसह विविध विभागात भर्ती, वाचा अर्ज करण्याची अंतिम मुदत

सरकारी नोकरी : कोस्टगार्ड, नाबार्डसह विविध विभागात भर्ती, वाचा अर्ज करण्याची अंतिम मुदत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : सरकारी नोकरीसाठी अनेक जण स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. तुम्ही देखिल सरकारी नोकरीसाठी परीक्षांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इथे महत्वाची बातमी आहे. कारण कोस्टगार्ड, नाबार्डसह अनेक विभागात सरकारी नोकरीसाठी भर्ती निघाली आहे. ज्यामध्ये आयसीजी इंडियन कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तट रक्षक सेवा विभागात अर्ज करण्यासाठी शेवटची मुदत उद्यापर्यंतच आहे. या विभागात विविध पदांवर 300 जागांची भरती होत आहे.

मुळात ICG विभागातील भर्ती परीक्षेसाठीचा अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 सप्टेंबर 2022 पर्यंतच होती. मात्र, ICG च्या वेबसाईटवर एक अधिसूचना जारी करून अर्ज करण्याची अंतिम मूदत वाढवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की सीजीईपीटी 01/2023 च्या बॅचसाठी अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2022 सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत वाढवली आहे. भारतीय तट रक्षक भर्ती 01/2023 अभियान 300 रिक्त जागांसाठी आयोजित करण्यात आला आहे.

joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही परीक्षेसाठी अर्ज करू शकता. सामान्य श्रेणी उमेदवारासाठी 400 रुपये आवेदन शुल्क आहे. तर एससी/एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएस श्रेणीचे उमेदवारांना शुल्क आकारले जाणार नाही. तर त्यांना फक्त सूचना शूल्क 50 रुपये राहणार आहे. मेरिटनुसार अंतिम निवड केली जाईल.

तसेच नॅशनल बँक फॉर अॅग्रीकल्चर अॅण्ड रूरल डेवलपमेंटच्या (नाबार्ड) डेवलपमेंट असिस्टंट (हिंदी) पदासाठी भर्ती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवार नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन nabard.org अर्ज/आवेदन करू शकतात. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे. नाबार्ड भर्ती एकूण 177 पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. नाबार्डची परीक्षा 100 अंकांची असेल. प्राथमिक परीक्षा ऑनलाइन असेल. 6 नोव्हेंबर 2022 ला ही परीक्षा घेण्यात येणार आहे. तर दुस-या चरणातील परीक्षेची घोषणा स्वतंत्र केली जाईल.

हे ही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news