आजचे राशिभविष्य (दि. ३ सप्टेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. ३ सप्टेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः व्यापार-व्यवसायात परिश्रम घ्याल. व्यवसायवृद्धीसाठी चांगले नियोजन कराल. कामांमध्ये अडचणी आल्यास मित्र सहकार्य करतील.

 

राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः नवीन कल्पना सुचतील. त्या अमलात आणल्यामुळे कामामध्ये प्रगती झाल्याचे आढळून येईल. महत्त्वाची कामे सुरळीत पार पडतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः व्यापार व्यवसायात चांगली वाढ होईल. व्यवसायामध्ये अपेक्षित उत्पन्‍न मिळेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. अनावश्यक खर्च टाळा.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः दिवस सुखसोयींचा आहे. कामांमध्ये अडचणी दूर होणार आहेत. पैशाचे प्रश्‍न सुटतील. त्यामुळे देणी दिली जातील. व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव राहील.
राशिभविष्य
सिंह
सिंह ः खर्च वाढतील. महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नका. काही निर्णयात तडजोड करावी लागेल. शांतपणे विचार करा. काही तत्त्वांना आळा घालावा लागेल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः कामाची धावपळ चालू राहील. एकाच विचारात अडकू नका. कामाचे नियोजन करा. नोकरीमध्ये चांगले वातावरण असणार आहे.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः प्रलंबित कामांना गती मिळेल. मन प्रसन्‍न राहील. जिभेचे चोचले पुरवताना तब्येतीची काळजी घ्या. घरातल्या समस्यांमध्ये अडकू नका.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्‍चिक ः नोकरीमध्ये मनासारखे वातावरण राहील. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रवास होण्याची शक्यता. मनासारख्या घटना घडतील.
राशिभविष्य
धनु
धनु ः दिवस मिश्र स्वरूपाचा असेल. नोकरी-व्यवसायात जास्त काम पडेल. कामाचा ताण येईल. आपली कामे प्रलंबित ठेवू नका. शक्यतो प्रवास टाळा.
राशिभविष्य
मकर
मकर ः प्रेमप्रकरणात यश येईल. मुलांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधा. आपल्या योजना मनाप्रमाणे कार्यान्वित होणार आहेत.
कुंभ -
कुंभ
कुंभ ः गृहसौख्यात वाढ होणार आहे. जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल. संपत्तीची कामे मार्गी लागतील. आर्थिक बाजू चांगली राहील. चांगल्या संधी मिळतील.
मीन
मीन
मीन ः कामामध्ये प्रगती होणार आहे. नातेवाईकांचे सहकार्य मिळेल. त्यांच्या भेटीगाठी होतील. एखादी चांगली बातमी कळेल. प्रवासाची शक्यता आहे.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button