आजचे राशिभविष्य (दिनांक २८ जुलै २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक २८ जुलै २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष- मानसिकता बदलण्याची गरज . कौटुंबिक अस्वास्थ्य राहील. संवादाने प्रश्न सोडवण्याची गरज. अनावश्यक भीतीने नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ- आप्तेष्टांच्या मदतीने कामे मार्गी लागतील. ठरवलेल्या कामांमध्ये यश मिळेल. संधी उपलब्ध होतील. आर्थिक उन्नती होईल. आत्मविश्वास वाढेल.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन- दिवसाची सुरुवात शुभवार्तेने होईल. कामात अडचणी येतील. आर्थिक परिस्थिती बेताची राहील. व्यावहारिक सावधानता आवश्यक आहे.
राशिभविष्य
कर्क
कर्क- प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. खंबीरपणे लोकांच्या पाठीशी उभे रहाल. मित्रमंडळींबरोबरचे संबंध दृढ होतील, एकंदर मनासारख्या घटना घडतील.
राशिभविष्य
सिंह
सिंह- अनावश्यक भीती बाळगण्याच्या सवयीमुळे मनःस्ताप होईल. मनातील कल्पित संशय अस्वस्थता निर्माण करेल. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस.
राशिभविष्य
कन्या
कन्या- व्यावसायिक प्रगती होईल. योग्य मार्गाने वाटचाल कराल. मित्रमंडळींसमवेत जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, वैवाहिक सौख्य उत्तम राहिल.
राशिभविष्य
तुळ
तुळ- कार्यसिद्धी योग. पदोन्नतीचे योग. अशक्य काम शक्य कराल. त्यामुळे कौतुक होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. इच्छापूर्तीचा दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक- अनावश्यक खर्चावर नियंत्रण गरजेचे. बचतीकडे लक्ष द्यावे लागेल. सरकार दप्तरी दंड भरावा लागू शकतो. नियमांचे पालन करावे.
राशिभविष्य
धनु
धनु- एखाद्याला मदत करूनही तो कृतघ्नपणा करेल. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील. प्राणायाम, योग साधनेची गरज आहे. मनःस्वास्थ्य बिघडवणारा दिवस.
राशिभविष्य
मकर
मकर- सगळ्या गोष्टी मनासारख्या घटना घडतील. यशाकडे वाटचाल कराल. आपापसामध्ये सामंजस्य निर्माण होईल. मानसन्मान मिळवून देणारी घटना घडेल.
कुंभ -
कुंभ
कुंभ- खर्‍याअर्थाने दिवस सार्थकी लागेल. जुने येणे वसूल होईल. लाभदायक दिवस ठरेल. कामाची जबाबदारी वाढेल. सौख्यकारक दिवस. शत्रूंवर विजय प्राप्त कराल.
राशिभविष्य
मीन
मीन- गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. सट्टा, लॉटरी, शेअर्समधे नुकसान होण्याची शक्यता आहे. सज्जनांचा सहवास लाभेल. प्रतिष्ठा पणाला लागेल.

– पं. प्रसाद जोशी

Back to top button