आजचे राशिभविष्य (दि. 6 जून 2022) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. 6 जून 2022)

मेष – दुःखदायक घटना घडतील. दिलेला शब्द पाळा. प्रेम प्रकरणामध्ये अडचणी येण्याची संभावना. आर्थिक नियोजन आवश्यक आहे. संयम गरजेचा.

वृषभ – कौटुंबिक वातावरण बिघडेल. प्रत्येकाचे मत जाणून मगच निर्णय घ्यावा. अनावश्यक भीती निर्माण होईल. वाहने जपून चालवावीत.

मिथुन – मैत्रीला जागाल. बौद्धिक क्षमता वाढेल. मनासारखी खरेदी होईल. कला-गुणांना वाव मिळेल. कलाकार, लेखकांना प्रोत्साहन मिळेल.

कर्क- आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. परिश्रम घेणे आवश्यक. कौटुंबिक समस्या निर्माण होतील. कामांमध्ये अडचणी येतील.

सिंह- भाग्यकारक घटना घडतील. कामांमध्ये यश मिळेल. ईष्ट ते साध्य होईल. आनंददायी दिवस. प्रसन्नता लाभेल. मनसोक्त खरेदीचा दिवस.

कन्या- आत्मचिंतनाची गरज. गैरसमजातून वादविवाद होतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. ईर्ष्या, स्पर्धा यामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे.

तूळ – व्यावसायिक भरभराटीचा दिवस. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग संभवतात. प्रेम प्रकरणे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.

वृश्चिक – पदोन्नती होईल. वरिष्ठांचा आर्शीवाद लाभेल. यशाकडे वाटचाल कराल. मनासारख्या घटना घडतील. कौतुकास्पद कार्य कराल.

धनु – व्यायाम व योग साधनेची गरज. सकारात्मक विचार महत्त्वाचे. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील.

मकर – सुवार्ता कानी येईल. मन:स्ताप होण्याची शक्यता. वादविवादामध्ये पडू नका. चूक मान्य करावी लागेल. सामंजस्याने विषय सोडवा.

कुंभ – प्रेम-प्रणयाचा दिवस. आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. छोटे प्रवास घडतील. व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल.

मीन- आरोग्य उत्तम राहील. योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग. जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. शत्रू पीडा कमी होईल. धनप्राप्तीचे योग.

Back to top button