तूम्ही पण वाय-फाय वापरताय? सावधान! तुमचा डेटा चोरी होऊ शकतो. | पुढारी

तूम्ही पण वाय-फाय वापरताय? सावधान! तुमचा डेटा चोरी होऊ शकतो.

पुणे: पुढारी वृत्तसेवा

सध्याच्या डिजिटल काळात इंटरनेटशिवाय कोणतेही काम करणे अवघड आहे. मग ते काम तुमच्या ऑफिसशी संबंधित काम असो किंवा स्वतःचे आणि इतरांचे मनोरंजन करणे असो. ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी देखील आपल्याला इंटरनेट आवश्यक असते. वाढत्या डिजिटायझेशनमुळे आपल्या जीवनात इंटरनेटची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळेच लोक आता असा रिचार्ज प्लान निवडतात, ज्यामध्ये अधिक इंटरनेट डेटा उपलब्ध असेल. पण बऱ्याच वेळी लोक इंटरनेट डेटा नसताना किंवा डेटा वाचवण्यासाठी सार्वजनिक वाय-फाय वापरतात. परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की विनामूल्य वाय-फाय वापरणे तुमच्यासाठी धोकादायक असू शकते.

राहुल गांधी गोव्यात दाखल, घरोघरी सुरु केला प्रचार

अनेक ठिकाणी पब्लिक वाय-फाय उपलब्ध असतात. जे पासवर्डशिवाय अॅक्सेस करता येतात. परंतु हे वाय-फाय तुमच्यासाठी सुरक्षित नाहीत. हॅकर्स तुमचा डेटा चोरी करण्यासाठी वाय-फायचा मार्ग वापरू शकतात. तूम्ही सुद्धा वाय-फाय वापरत असाल तर आज आम्ही तुम्हाला डेटा सुरक्षित ठेवण्यासाठीचे काही उपाय सांगणार आहोत.

असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबारानंतर ओवेसींना केंद्राकडून झेड दर्जाची सुरक्षा

हॅकर्स अशी करू शकतात चोरी

हॅकर्स तुमच्या फोनवर दोन प्रकारे हल्ला करतात. यातील पहिला प्रकार “मॅन इन द मिडल” (MITM) हल्ला. यामध्ये हॅकर्स वापरकर्त्यांचा डेटा चोरण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्लिकेशन किंवा वेबसाईटचा वापर करतात. दुसऱ्या प्रकारच्या हल्ल्यात हॅकर्स लोकांच्या फोनमध्ये प्रवेश करतात. “पॅकेट स्निफिंग” अटॅकमध्ये हॅकर्स तूम्ही वाय-फाय द्वारे पाहिलेल्या, सर्च केलेल्या आणि डाऊनलोड केलेल्या गोष्टींची माहिती सहजपणे मिळवतात.

‘रंगीले रतन’ मराठीतलं ‘चालचलन’ बिघडवतायत… त्या माजोरड्यांना हा मेसेज गेला पायजे : किरण माने

कोणता डेटा चोरला जातो?

या प्रकारच्या हल्ल्यांना सायबर हल्ला म्हणतात. यामध्ये हॅकर्स तुमचा पत्ता, तुमचे फोटो, व्हिडिओ, कॉन्टॅक्ट नंबर, गुगल हिस्ट्री आणि तुमच्या फोनमधील बँक तपशील यासारखी सर्व महत्त्वाची माहिती चोरू शकतात.

काय काळजी घ्याल?

• या प्रकारचा हल्ल्यापासून वाचण्यासाठी तुम्ही VPN म्हणजेच व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क वापरायला हवे. हे तुम्हाला सार्वजनिक नेटवर्कवरही खासगी नेटवर्कची सुविधा देते. तसेच वापरकर्त्याला सुरक्षितरित्या इंटरनेट वापरण्याचे स्वातंत्र्य देखील देते.
• सार्वजनिक वाय-फायचा वापर करून कोणतीही आर्थिक माहिती कुठेही अपलोड करू नका. बॅंक अकाउंटचे तपशील भरू नका.
• एकसारखा पासवर्ड अनेक वेबसाइटस् आणि अकाउंटसाठी वापरू नका. कोणताही पासवर्ड सेव्ह करू नका
• काम पूर्ण झाल्यावर लगेच लॉग आउट करा.
• अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. तसेच वेबसाइटची सुरक्षितता तपासून मगच क्लिक करा.
• मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये अॅन्टीव्हायसर सिस्टिम किंवा अॅप्स इन्स्टॉल करा.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्‍लू अर्जुनने ‘थलैवा’ला टाकले मागे

Back to top button