आजचे राशिभविष्य ३० जानेवारी २०२२ | पुढारी

आजचे राशिभविष्य ३० जानेवारी २०२२

मेष – मानसिक ताणतणाव निर्माण होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारी कामांमध्ये अडचणी येतील.

वृषभ – आपसात वादविवाद होतील. कौटुंबिक वातावरण ताणतणावाचे राहील. मानसिक व शारीरिक आरोग्य सांभाळावे. मानहानीचे प्रसंग निर्माण होतील.

मिथुन – व्यावसायिक व नोकरदारांसाठी लाभदायक दिवस. शत्रूंवर मात कराल. भागीदारीमध्ये लाभ संभवतो. कोर्ट-कचेरीच्या कामांमध्ये यश मिळेल. प्रवासाचे योग संभवतात.

कर्क – नोकरदारांसाठी लाभदायक दिवस ठरेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मान-सन्मान होतील. सज्जनांचा सहवास लाभेल.

सिंह – पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द होतील. अस्वस्थता राहील. वादविवादापासुन दूर राहा. मध्यस्थी करू नका. कुटुंबीयांची काळजी घ्यावी लागेल.

कन्या – जमिनीसंबंधित कामांमध्ये अडचणी येतील. कौटुंबिक वादविवाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक आहे. वाहने जपून चालवावीत.

तुळ – कलागुणांना वाव मिळेल. आत्मविश्वास वाढेल. यशाकडे वाटचाल कराल. जवळच्या मित्रांचे प्रेम-सहकार्य लाभेल. नियोजनबद्धतेमुळे यशस्वी दिवस.

वृश्चिक – वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. अन्यथा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल दिवस. नुकसान होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे.

धनु – प्रयत्नांना यश मिळेल, इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. आप्तेष्टांच्या सहवासाने प्रसन्नता लाभेल. मनसोक्त खरेदीचा आनंद घ्याल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल.

मकर – प्रेम-प्रकरणांमध्ये अपयश संभवते. कोणालाही जामीन राहू नका. भावनाप्रधान होण्याचे प्रसंग येतील. अनावश्यक खर्च होईल. संयमाने वागावे लागेल.

कुंभ – सामाजिक व सांस्कृतिक कार्यामध्ये सहभाग प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. व्यावसायिक उत्कर्ष होईल.

मीन – प्रतिष्ठा मिळवून देणारी घटना घडेल. कौतुकास्पद कार्य होईल. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगती होईल.

Back to top button