

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॅालीवूडमधील लोकप्रिय अभिनेता, गायक आणि निर्माता फरहान अख्तर पुन्हा चर्चेत आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार फरहान अख्तरला (Farhan Akhtar )एक मोठा प्रोजेक्ट मिळालेला आहे. फरहान हा लवकरच डिज्नी प्लस चॅनेलच्या आगामी 'एमएस मार्वल' ( MS Marvel) वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.
शिवानी दांडेकरने सोशल मिडिया अकाउंटवरून या नव्या सिरीजशी संबंधीत फोटो शेअर केलेले आहेत. फरहान अख्तरच्या या मोठ्या प्रोजेक्टबद्दल बोलायचे झाले तर, शिवानी दांडेकर सोबत लग्न केलं आणि नशीब बदललं असं म्हणता येईल. काही दिवसांपूर्वी शिवानी दांडेकर सोबत लग्न झाल्या नंतर फरहान अख्तर चर्चेत आला होता.
इमान वेल्लानी दिग्दर्शन करत असणाऱ्या मार्वल सिरीजमध्ये फरहान अख्तर महत्वाची भुमिका बजावणार आहे. या सिरीजमध्ये अरामिस नाईट, सागर शेख, ऋषी शाह, जेनेबिया श्रॅाफ, मोहन कपूर, मैट लिंट्ज, यास्मिन फ्लेचर लैथ नाकली, अजहर इस्मान, ट्रैविना स्प्रिंगर आणि निमरा बुचा हे मोठे कलाकार या सिरीजमध्ये पहायला मिळतील. पण या सिरीजमध्ये फरहान अख्तर कोणता रोल साकारणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहीले आहे. अभिनेता या सिरीजमध्ये गेस्ट अपिअरेन्स ही भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.
एमएस मार्वलचा प्रिमिअर ओटीटी प्लॅटफॅार्मवर 8 जून रोजी प्रदर्शीत होईल. अदिल अरबी आणि बिलाल फलाह, मीरा मेनन आणि शरमीन, ओबेद -चिनौयने यांनी ही एमएस मार्वल सिरीजची निर्मिती केली आहे. काही दिवसांपूर्वी मार्वलचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला, पण या ट्रेलरमध्ये फरहान कुठेही दिसून आला नाही. त्यामुळे फरहानचा मार्वल सिरीजच्या ट्रेलरमधील रोल अजून गुलदस्त्यात आहे. ट्रेलर मध्ये फरहान कुठेच दिसून आला नाही, यामुळे चा चाहतावर्ग नाराज झाला. लवकरच त्याची मार्वल सिरीजमधील भुमिका स्पष्ट होईल.
फरहानच्या इतर अभिनयाविषयी बोलायचे झाले तर फरहान अख्तर सध्या 'जी ले जरा' स्क्रिप्टवर काम करत आहे. यामध्ये प्रियांका चोप्रा, आलिया भट्ट, आणि कॅटरिना कैफ या अभिनेत्री आहेत