

ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या १२६ धावांचे आव्हान इंग्लंडने ११.४ षटकात २ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. इंग्लंडकडून सलामीवीर जोस बटलरने धडाकेबाज फलंदाजी करत ३२ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी केली. त्याला जेसन रॉयने २२ तर जॉनी बेअरस्टोने नाबाद १६ धावा करुन चांगली साथ दिली. या विजयाबरोबच इंग्लंडने सेमी फायनलमधील आपली जागा पक्की केली.
इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचे १२६ धावांचे आव्हान पार करताना दमदार सलामी दिली. जेसन रॉय आणि जोस बटलरने ६ षटकात बिनबाद ६० धावांपर्यंत मजल मारली. ही सलामी जोडी ऑस्ट्रेलियाचे आव्हान नाबाद पार करणार असे वाटत असतानाच झाम्पाने रॉयला २२ धावांवर बाद केले.
त्यानंतर आलेला डेव्हिड मिलानही ८ धावांची भर घालून एगरच्या गोलंदाजीवर बाद झाला. दरम्यान, बटलरने आपले आक्रमक अर्धशतक पूर्ण करत संघाचे शतक पार करुन दिले होते. त्याच्या साथीला आलेल्या बेअरस्टोनेही दोन षटकार मारत सामना लवकर संपवण्यास हातभार लावला. अखेर १२ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर विजयी धाव घेत इंग्लंडचा वर्ल्डकपमधील तिसरा विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, टी २० वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला एका पाठोपाठ एक धक्के दिले. ख्रिस वोक्सने डेव्हिड वॉर्नरला १ धावेवर बाद केले. त्यानंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथला जॉर्डनने १ धावेवर बाद करुन ऑस्ट्रेलियाला ८ धावावर दोन धक्के दिले.
यानंतर ख्रिस वॉक्सने ग्लेन मॅक्सवेलला ६ धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाला तिसरा आणि मोठा धक्का दिला. या धक्यातून सावरण्यासाठी मार्कस स्टॉयनिस मैदानावर आला होता. मात्र आदिल राखीदने त्याला भोपळाही फोडू दिला. नाही. ४ बाद २१ अशी बिकट अवस्था झाली असताना सलामीवीर फिंच आणि मॅथ्यू वेड यांनी ऑस्ट्रेलियाला सावरण्याचा प्रयत्न केला. ( ENG vs AUS )
या दोघांनी १२ व्या षटकात ऑस्ट्रेलियाला अर्धशतक पूर्ण करुन दिले. परंतू ही जोडी लिव्हिंगस्टोनने वेडला १८ धावांवर बाद करत कांगारुंना पाचवा धक्का दिला. यानंतर फिंच आणि एस्टन अॅगरने सहाव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला १०० च्या जवळ पोहचवले. मात्र टीयमल मिल्सने अॅगरला २० धावांवर बाद करत ही जोडी फोडली.
दरम्यान, फिंच आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला होता. मात्र फिंचला जॉर्डनने ४४ धावांवर बाद केले. फिंच बाद झाला त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या १८ षटकात ११० धावा झाल्या होत्या. यात पॅट कमिन्सच्या दोन षटकारांचाही वाटा होता. मात्र फिंचनंतर तोही ५ चेंडूत १३ धावा करुन बाद झाला. अखेर स्टार्कने अखेरच्या षटकात १३ धावा करत ऑस्ट्रेलियाला १२५ धावांपर्यंत पोहचवले.