नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हवाला प्रकरणात गंभीर आरोप झालेल्या पंजाब पोलीस दलातील माजी अधिकारी इंदरजीत सिंग यांच्या 1.32 कोटी रुपयांच्या संपत्तीवर सक्तवसुली संचलनालयाने टाच आणली आहे. एका ड्रग तस्करी प्रकरणाचा तपास करताना सिंग यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली होती.