

इंफाळ : पुढारी ऑनलाईन मणिपूरच्या नाेनी जिल्ह्यात आज (मंगळवार) रात्री २ वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाचे केंद्र भूगर्भात २५ किलोमीटरच्या खोलीवर होते. या भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकपामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे भूकंप विज्ञान केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
याआधी १९ फेब्रुवारी रोजी आंध्र प्रदेशच्या एनटीआर जिल्ह्यात नंदीग्राम शहरात भूकंप झाला होता. भूकंपाचे धक्के रविवार सकाळी ७ वाजून १३ मिनिटांनी झाला होता. ३.४ सेकंद पर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले होते. यावेळी घरातून बाहेर पडून नागरिक रस्त्यावर आले होते. त्याच दिवशी ३.० तीव्रतेचा भूकंप मध्य प्रदेशात झाला होता.