

रोहे : भारतीय विशेष ट्रेनच्या माध्यमातून 1 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान रेल्वेतून 65 लाख प्रवाशांनी प्रवास केला. 1 ऑक्टोबर ते दि. 5 नोव्हेंबर दरम्यान विशेष ट्रेन मधून सुमारे 7.5 कोटी प्रवाशांनी बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंड येथे प्रवास केला.
भारतीय रेल्वेतून 4 नोव्हेंबरला रोजी एका दिवसात सर्वाधिक प्रवासी वाहतूक झाली होती. तीन कोटी प्रवासी रेल्वेत प्रवासाकरिता चढले जे जास्त आहेत. ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंडच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा हे जास्त आहेत. 4 नोव्हेंबर 2024 120.72 लाख (19.43 लाख आरक्षित आणि 101.29 अनारक्षित गैर-उपनगरीय) प्रवाशांची वाहतूक,180 लाख उपनगरीय ट्रॅफिक हाताळली, चालू वर्षात एक दिवसाची सर्वाधिक प्रवासी संख्या आहे.
दिवाळी पूजा, छटपूजा या सणत्सवातील गर्दी 2024 साठी 1 ऑक्टोबर 2024 ते 30 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान एकूण 7,666 विशेष रेल्वे सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. याच कालावधीत गेल्या वर्षी 4,429 फेर्या चालवण्यात आल्या होत्या. 1 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर तारखेपर्यंत 4521 विशेष ट्रेन चालल्या आहेत. विशेष रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून 65 लाख नागरिकांची सुविधा दिली.