नाशिक : पहिला दिवा लागता दारी सुखाचे किरण येई घरी. प्रकाशपर्व दीपोत्सवास सोमवारी (दि.२८) वसू बारसने प्रारंभ होत आहे. आनंदाचे क्षण घेऊन आलेल्या दिवाळीनिमित्ताने नाशिककरांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे.
प्रारंभ : सोमवारी (दि.२८) सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिट
समाप्ती : मंगळवार (दि.२९) सायंकाळी ५ वाजून ०४
आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी म्हणजे गोवत्सद्वादशी किंवा वसुबारस म्हणून ओळखले जाते. या दिवसाला रमा एकदशी म्हणून ओळखले जाते. वसु म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी. गाय ही समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मात गाय ही पुजनीय असल्याने तिच्या सन्मानार्थ यादिवशी गाय-वासराचे पूजन करण्यात येते. वसुबारसपासून दीपोत्सवास खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो.
यंदाच्या वर्षी सोमवारी वसुबारस साजरे करण्यात येणार आहे. दीपोत्सवासाठी अवघी नाशिक नगरी सजली आहे. नाशिककरांमध्ये आनंद संचारला आहे. बाजारपेठेतही चैतन्य निर्माण झाले आहे. वसुबारसच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ वस्त्र परिधान करून घराबाहेर गोपद्म रांगोळी काढावी. घरात गाय-वासरु असल्यास त्यांची सहकुंटुंब मनाेभावे पूजन करावे. तसेच गाय-वासराला पुरणपोळीचा नवैद्य खाऊ घालावा. शहरी भागात गाई व वासराच्या मूर्ती अथवा फोटोचे पूजन करून नवैद्य अर्पण करावा.