

पुढारी ऑनलाइन डेस्क : Diwali Festival : दिवाळी सर्वांना आनंदी, समृद्धी आणि भरभराटीची जावो, अशा शुभेच्छा आपण सर्वांना देतो. मात्र, दिवाळीच्या दिवशी काही जणांच्या संसार जळून राख रांगोळी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दिल्लीमध्ये अशीच एक घटना घडली. दिवळीतील फटाक्यांमध्ये सोडण्यात येणा-या रॉकेटमुळे इथे राहणा-या वंदना वर्मा यांच्या संसाराला भस्म केले आहे.
Diwali Festival : वंदना वर्मा या दिल्लीतील द्वारका भागात आपले पती आणि मुलांसह राहतात. दोन बेडरूमचे त्यांचे घर आहे. वंदना आणि त्यांच्या पतींनी लग्नाच्या एक वर्षानंतरच हे घर घेतले होते. सोमवारी दिवाळीच्या दिवशी वंदना आणि त्यांचे कुटुंब सायंकाळी घरातील आवरून नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी घरातील बाल्कनीतून एक रॉकेट आत आला आणि पाहता पाहता चिंगारी पेटून आग लागली.
त्यांच्या परत येईपर्यंत शेजा-यांनी अग्निशामक दलाला बोलावले होते. अग्निशामक दलाने तात्काळ आग विझवली. मात्र तो पर्यंत घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या होत्या.
Diwali Festival : दरम्यान, वंदना यांनी फटाक्यांविरोधात कडक प्रतिबंध लावायला सांगितले आहे. तसेच परमेश्वराच्या कृपेने शेजा-यांना काही झाले नाही, असे त्या म्हणाल्या. त्यांनी दुःखी मनाने मुलासाठी मोठ्या हौसेने घेतलेला अभ्यासाचा टेबल जळाल्याचे सांगितले. तसेच घरातील भांडी, कपडे, कपाट आदी गोष्टी जळाल्या. सायंकाळी जाण्यापूर्वी वंदना यांनी मोठ्या हौसेने संपूर्ण घर सजवले होते. फुलांची रांगोळी काढली होती. मात्र, रिटर्न आल्यावर सर्व काही अनर्थ झाले होते.
Diwali Festival : सध्या दिल्लीमध्ये प्रदूषण अतिशय उच्चस्तरावर असल्याने फटाक्यांवर बंदी आणली आहे. दिल्लीच्या हवेत श्वास घेणेही कठीण झाले आहे. मात्र, तरीही अनेक बंदीला झुगारून मोठ्या प्रमाणात फटाके वाजवले. दिल्लीतील अग्निशामक विभागाला दिवाळीच्या रात्री आग लागल्याच्या घटनेबद्दल 201 कॉल आले होते. ज्याची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्के जास्त आहे.
हे ही वाचा :