

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुका विस्ताराने मोठा आहे. दुष्काळी परिस्थिती असताना मोठ्या अडचणी येत आहेत. जनतेला मदत मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. शिवाय, संख अप्पर तहसील कार्यालय असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तालुक्याचे त्रिभाजन व्हावे, या सह मागण्यासाठी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडली.
दरम्यान, एम सॅन्ड(कृत्रिम वाळू) वाहतुकीच्या अनुषंगाने औरंगाबाद व मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की एम सॅन्ड हा गौणखनिज मध्ये मोडत नाही महसूल विभागाकडून न्यायालयाचा निर्णय डावलून वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करत चुकीच्या पद्धतीने लाखोंचा दंड वसुल केला जात आहे. त्यामुळे या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
यासह जत नगरपरिषदसाठी पायाभूत व मूलभूत सुविधासाठी पाणी, पार्किंग, शौचालय साठी निधी मिळावा. शिवाय, अमृत मिशन 2 योजनेतून शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी वारंवार मागणी करून तो मिळत नाही. यासाठी गेली दोन अडीच वर्षे हा प्रस्ताव राखडला आहे. त्याला तात्काळ मंजुरी देण्यात यावी. बाहेरच्या राज्यात बी.एम.एसचे शिक्षण घेऊन आपल्या राज्यात एम. डी. पदवी अभ्यासक्रमसाठी प्रवेश मिळत नाही. यासाठी वैद्यकीय मंत्र्यांना विनंती करतो की वैद्यकीय कायद्यामध्ये बदल करून या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशीही मागणी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी केली.