Disha Patani Birthday : जाणून घ्‍या…अभिनेत्री दिशा पटानीच्‍या फिटनेसचे रहस्य

Disha Patani Birthday : जाणून घ्‍या…अभिनेत्री दिशा पटानीच्‍या फिटनेसचे रहस्य
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीला नेहमी तिच्या अभिनयासोबत फिटनेस आणि फॅशन सेन्सने चाहत्यांच्या मनावर राज्य करत असते. दिशा आज तिचा ३० वा वाढदिवस (Disha Patani Birthday ) साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त दिशा पटानीच्या फिटनेसबाबत रहस्य जाणून घेवूयात..

अभिनेत्री दिशा पटानी नेहमी आपल्या हॉट फोटोंनी सोशल मीडियात सक्रिय असते. चाहते तिच्या अभिनयासोबत फॅशन सेन्सची चर्चा सर्वत्र पसरलेली आहे. दिशाने 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने एकाहून एक हिट चित्रपटात काम केलं.  दिशा नेहमीच फिटनेसच्या बाबतही सजग असल्याचे दिसतेय. स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी ती जिममध्ये तासनतास घाम गाळून स्वत:ला फिट ठेवण्याच्या प्रयत्नात असते.

आठवड्यातून चार दिवस व्यायाम

दिशा एका ट्रेंड जिमनास्ट आहे हे काही मोजक्याच लोकांना माहित आहे. ती नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या वर्कआउट्स करताना जिममध्ये दिसतेय. दिशाला जिममध्ये व्यायाम करायला आणि स्वत: ला फिट ठेवणे आवडते. यासाठी ती दिवसातून दोनदा जिममध्ये जाण्याचा प्रयत्न करते. तर आठवड्यातून चार दिवस व्यायाम करते. यात ती दररोज सकाळी कार्डिओत सायकलिंग करणे, नृत्य, किक बॉक्सिंग किंवा जिम्नॅस्टिक आणि संध्याकाळी वजन उचलणे. स्विमिंग किंवा योगा करते.

दिशाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करायलाही आवडते. दिशा बी-टाउनर हिप थ्रस्टपासून केक वॉकसारखी डेडलिफ्ट करू शकते. दिशाचे तिच्या इंन्स्टाग्रामवर व्यायामाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात.  (Disha Patani Birthday )

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news