

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वायुसेनेला (Indian Air Force) ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारी ( दि. ८) चंदीगडच्या सुखना तलावावर दिमाखदार एअर शो आयोजित करण्यात आला. यावेळी ८० लष्करी विमाने आणि वायुसेनेच्या ५ पथकांनी फ्लायपास्टमध्ये भाग घेतला. सर्व प्रकारची लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टरच्या पराक्रमाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी हवाई दलाच्या जमिनीवरील जवानांसाठी डिजिटली कॅमफ्लाज केलेल्या स्पेशल गणवेशाचे अनावरण केले.
या वर्षाच्या सुरुवातीला वायुसेनेने (Indian Air Force) नवीन डिजिटल कॅमफ्लाज्ड कॉम्बॅट युनिफॉर्मचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला. भारतीय लष्कराचा नवीन लढाऊ गणवेश नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) ने डिझाईन केला होता. जानेवारीमध्ये लष्कर दिनानिमित्त त्याचे अनावरण करण्यात आले होते. वायुसेनेच्या एकसमान अपग्रेडसाठी या डिझाइनचा वापर केला आहे. वायुसेनेचे ग्राउंड कर्मचारी ज्या परिस्थितीमध्ये काम करतात. त्या परिस्थितीनुसार गणवेशाचे डिझाईन केले आहे.
नवीन गणवेश सर्व भूप्रदेश आणि सर्व-ऋतूंसाठी अनुकूल आहे. त्याचबरोबर वेगळे व हलके फॅब्रिक वावरून डिझाइन केल्यामुळे या गणवेशामध्ये आरामदायी वाटते. कोणत्याही वातावरणामध्ये जवानांची कार्यक्षमता टिकून राहिते. अर्गोनॉमिक फिटिंग हे एक या गणवेशाचे वैशिष्ट्य आहे. पुरुष आणि महिला ग्राउंड ड्युटी कर्मचार्यांना त्यांची ऑपरेशनल क्षमता जास्तीत जास्त वाढविण्यास मदत करते. डिजीटल पॅटर्न हा सर्व भूप्रदेशासाठी अनुकूल आहे. जवानांना वाळवंट, जंगल, पर्वतीय आणि शहरी लँडस्केपमधून सहजतेने न ओळखता येणारा ह गणवेश आहे.
भारतीय वायुसेनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन गणवेशाचे रंग आणि छटा थोडे वेगळे असतील. वायुसेनेच्या कामाच्या वातावरणासाठी अधिक अनुकूल असे बनविण्यात आले आहेत.
दरम्यान, भारतीय वायुसेना ही जगातील चौथा सर्वात मोठा हवाई दल आहे. १९३२ मध्ये यूके रॉयल एअर फोर्सचे सहाय्यक दल म्हणून भारतीय वायुसेनेची स्थापना झाली होती. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, हवाई दलाचे नाव बदलून भारतीय वायुसेना असे करण्यात आले.
हेही वाचलंत का ?