Delhi ‘liquor scam’: दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी, ईडीच्या दाव्याने खळबळ; ‘आप’ला 200 कोटींची लाच; 100 कोटी अ‍ॅडवान्स

Delhi 'liquor scam':
Delhi 'liquor scam':
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइन डेस्क : Delhi 'liquor scam': दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने (अंमलबजावणी संचालनालयाने) केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. ईडीच्या दाव्यात केलेल्या नव्या खुलासांमध्ये आप कार्यकर्त्यांना 200 कोटींची लाच मिळणार होती. तसेच 100 कोटी अॅडवान्समध्ये देण्यात आले होते. दिल्लीतील दक्षिण गटाने वादग्रस्त उत्पादन शुल्क धोरण रद्द करण्यापूर्वी ही लाच ऑफर केली होती, असे ईडीने आपल्या दाव्यात म्हटले आहे.

ईडीने दाखल केलेल्या ताज्या पुरवणी आरोपपत्रात हा दावा केला आहे. आरोपपत्रात म्हटल्याप्रमाणे आप नेते आणि दक्षिण गट यांच्यात कथितपणे एक करार करण्यात आला होता. या करारानुसार आपला 100 कोटी रुपये आगाऊ देण्यात आले होते. (Delhi 'liquor scam') दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या जवळचे असणारे आपचे माजी संपर्क प्रमुख विजय नायर यांच्या जवळ ही रक्कम देण्यात आली होती. तर उर्वरित 100 कोटी रुपये विजय नायर आणि दक्षिण गट यांच्यात विभागले जाणार होते. AAP च्या उर्वरित 3.5 वर्षाच्या कार्यकाळासाठी ही भागीदारी कायम राहणार होती, असे ईडीने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे. ईडीच्या या आरोपपत्राची मंगळवारी विशेष न्यायालयाने दखल घेतली आहे.

Delhi 'liquor scam': घोटाळ्यातील आरोपी दिनेश अरोराचे स्टेटमेंट

ईडीने आरोपपत्रात केलेल्या दाव्यासाठी त्यांनी घोटाळ्यातील मुख्य आरोपी दिशेन अरोरा यांचे रेकॉर्ड केलेले स्टेटमेंट यामध्ये देण्यात आले आहे. अरोरा यांच्या स्टेटमेंटनुसार, "अबकारी धोरण L1 ला १२% नफा मार्जिनसह तयार केले गेले होते. त्यापैकी 6% विजय नायर (आप सरकारसाठी) यांना देण्यात येणार होते. एकूण मद्य व्यवसाय लक्षात घेता, सांगितलेल्या 6% किकबॅकची रक्कम सुमारे 210 कोटी रुपये आहे".

दक्षिण गटाने विजय नायरला 100 कोटी रुपये आगाऊ दिले जे त्यांना इंडो स्पिरिट्स, ब्रिंडको आणि महादेव या तीन प्रमुख वितरकांकडून वसूल करायचे होते, असे ईडीने म्हटले आहे. इंडो स्पिरिट्सचे थेट दक्षिण समूहावर नियंत्रण होते आणि त्यामुळे ही रक्कम वसूल करणे सोपे होते, असे त्यात म्हटले आहे.

Delhi 'liquor scam': संजय सिंह यांनी दिनेश अरोराची मनिष सिसोदिया यांच्याशी करून दिली होती ओळख

आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी आरोपी दिनेश अरोराची मनिष सिसोदिया यांच्याशी ओळख करून दिली होती. अरोरा हे सिसोदिया यांच्याकडून उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित सतत काम करून घेत होते आणि त्यांनी केजरीवाल यांची संजय सिंह यांच्या निवासस्थानी एकदा भेट घेतली होती. मात्र, संजय सिंह यांनी आपल्यावरील ईडीच्या आरोपांना नकार दिला आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news