बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! २२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार | Goa Rape News

बाप-लेकीच्या नात्याला काळीमा! २२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार | Goa Rape News

Published on

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण गोव्यात बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ४७ वर्षीय बापाने २२ वर्षांच्या स्वतःच्या दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. पोलिसांनी याबाबत गुन्हा नोंदवून या आरोपी बापाला गुरुवारी (दि. ६) अटक केली.

गोव्यातील एका तालुक्यात दिव्यांग मुलीवर बलात्कार झाल्याची घटना गुरुवारी (दि. ६) उघडकीस आली. संशयित ४७ वर्षीय बाप दिव्यांग मुलीचा सांभाळ करत होते. पीडित मुलीची आई कामानिमित्ताने परदेशात राहते. त्यामुळे मुलीला सांभाळण्याची जबाबदारी या बापावरच होती.

याच बापाने नात्याला काळीमा फासत स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. हा बाप बसचा चालक आहे. त्याने जून महिन्यात मारहाण करत मुलीवर चार वेळा बलात्कार केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे.

या घटनेने पीडिता पूर्णपणे निराशेत गेली आहे. वडिलांकडून लैंगिक अत्याचार होत असल्याचे कुणाकडे सांगणेही तिला कठीण होते. मात्र, शेवटी तिने धाडस करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेत संशयित बापाला गुरुवारी (दि. ६) अटक करण्यात केली. दरम्यान, बलात्कार करणे, जबरदस्ती करणे या भारतीय दंड संहितेच्या कलमांसह ९२ राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलीटी या कायद्यांतर्गत आरोपी बापाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news