काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफीनामा प्रसिद्ध करावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा घणाघात

काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफीनामा प्रसिद्ध करावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा घणाघात
Published on
Updated on

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : युपीए सरकारच्या काळात देशात सर्वाधिक दहशतवादी हल्ले,भ्रष्टाचार, घोटाळे आणि दंगे घडलेत त्यामुळे त्यांनी जाहीरनामा प्रसिध्द न करता माफीनामा प्रसिध्दी करायला पाहिजे, असा घणाघात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर केला.

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ चंद्रपूरात आयोजीत सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केद्रीय मंत्री रामदास आठवले, राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, अशोक नेते, हंसराज अहीर आदींची उपस्थिती होती.

शिंदे म्हणाले, युपीएच्या काळात देशात दशहतवादी हल्ले मोठ्या प्रमाणात झालेत. भ्रष्टाचार, घोटाळे, बॉम्बस्फोट, दंग्यांनी देश ग्रास्ला होता. त्या उलट फकत्‍ दहा वर्षात देशात प्रधानमंत्री मोदींच्या कारकिर्दीमध्ये देशात विकासाचा जोश, उत्साह, जल्लोष पहायाला मिळाला. काँग्रेसच्या पन्नास वर्षाच्या काळात जेवढी कामे झाली नाही तेवढी को तेवढी कामे प्रधानमंत्री मोदींच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात झाली, हा इतिहास आहे. काँग्रेसला पन्नास वर्षाचा हिशोब मागितला पाहिजे. काँग्रेसने पन्नास वर्षात देशाला कुठे नेऊन ठेवला आहे. काँग्रेसला जाहीरनामा प्रसिध्द करण्याचा अधिकार नाही. त्यांनी माफीनामा जाहीर करायला पाहिजे. देशाला खड्यात टाकण्याचा काम त्यांनी केला. ज्या ब्रिटीशांनी देशवर दिडशे वर्ष राज्य केले. त्योच्या कारकिर्दीला मागे ढकलल. मोदींनी देशाला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवले. जगभरात देशाचे नाव रोशषण करण्याचे काम मोदींनी केले. रामभक्तांचे राममंदिराचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. मोदी है तो मुमकीन है, वेा कभी न थकते है, ना कभी रूकते है, ऐसही लोग देश को बदलते है. देश का विकास करते हे उनका उनका नाम है नरेंद्र मोदी या शब्दात मोदींची स्तुती केली. जगभरातील प्रमुख त्यांची गळाभेट घेतात. हे चित्र देशाने कधीच पाहिले नव्हते. काँग्रेसकउे ना झेंडा आहे, न अजेंडा आहे. त्यांचेकउे एकच आहे कट, कमीशन आणि करप्शन परंतु मोदींजीकडे फस्ट नेशन आहे. देशाचा विकासाचा अजेंडा आहे. प्रगतीचा मार्ग आहे. त्यामुळे काँग्रेसला चारही मुंड्याचित करून राज्यात पंचेचाळीस पार नारा देत सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news