

पैठण : चंद्रकांत अंबिलवादे पैठण येथील श्रीसंत एकनाथ महाराज यांची नाथषष्ठी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे नाथषष्ठी पुर्वतयारीच्या निमित्ताने (रविवार) रोजी परंपरेप्रमाणे गावातील नाथवाड्यातील ज्या रांजणात प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने श्रीखंड्याच्या रूपात १२ वर्षे पाणी भरले, त्या पवित्र रांजणाची स्वच्छता नाथवंशज ह.भ.प. रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली नाथवंशज ज्ञानेश महाराज पालखीवाले, योगेश महाराज पालखीवाले, अथर्व पांडव, रविंद्र पांडव यांनी रांजणाच्या स्वच्छतेचे हे पवित्र कार्य केले.
हा रांजण २१ फुट खोल असुन ६×६ फुट एवढा भव्य आकाराचा आहे. रांजणाची पुर्ण स्वच्छता करून कोरडा करण्यात आला. निर्जंतुकीकरणासाठी या रांजनाला दोन दिवस उद,गुगळ यांचा धुप दिला जातो. २७ मार्च रोजी श्रीतुकाराम बीजेच्या दिवशी याच पवित्र रांजणाच्या पुजेने श्रीसंत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी पारंपारिक सोहळ्याला प्रारंभ करण्यात येतो. या पवित्र रांजणाची नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी पालखीवाले यांच्या हस्ते पूजन करण्यात आल्यानंतर पवित्र रांजण भरण्यास सुरुवात करण्यात येते. भगवान श्रीकृष्ण कोणा व्यक्तीच्या रूपात येऊन पाणी टाकतात तेव्हाच हा रांजण भरतो. अशी गेल्या अनेक दिवसापासून परंपरा आहे.
हेही वाचा :