महाराष्ट्रासह पानिपत, इंदुर, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि दिल्लीच्या विविध भागातील 'शंभुप्रेमी' कार्यक्रमास उपस्थित होते. 1996 साली छ. संभाजीनगर येथे प्रथम छ. संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली होती. त्यानंतर राज्यभर जयंती साजरी करण्यासाठी समितीच्या वतीने राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर चालू वर्षापासून सर्वत्र छ. संभाजी महाराज जयंती साजरी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.