कॅनडाच्या ओंटारियो शहरात गोळीबार, 3 मुलांसह 5 जण ठार
पुढारी ऑनलाईन : कॅनडाच्या उत्तर ओंटारियो शहरात गोळीबाराची घटना समोर आली आहे. यामध्ये तीन मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार रात्री (स्थानिक वेळेनुसार) घडली. पोलिसांनी सांगितले की, ते गुन्ह्याच्या ठिकाणी अधिक तपास करत आहेत.
कॅनडाच्या पोलिसांनी आज (बुधवार) दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील ओंटारियो शहरातील तीन मुले आणि कथित शूटरसह पाच लोक गोळीबारात मरण पावले आहेत.
(मंगळवार) स्थानिक वेळेनुसार रात्री 10:30 वाजता झालेल्या गोळीबारात एक (6 वर्षांचा) मुलगा, दुसरा (7 वर्षांचा) मुलगा, तिसरा (12 वर्षीय) मुलगा आणि एका (41 वर्षीय) वृद्धाचा मृत्यू झाला, असे पोलिसांनी सांगितले.
कॅनेडियन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांना रात्री 10:20 च्या सुमारास एक फोन आला. यानंतर घटनास्थळी पोलिसांना टँक्रेड स्ट्रीटवरील एका घरात बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे आढळले. दहा मिनिटांनंतर, त्यांना जवळच्या निवासस्थानी बंदुकीच्या गोळीने झालेल्या दुखापतीची तक्रार करणारा दुसरा कॉल आला. त्यानंतर, त्यांना तीन मुले मृतावस्थेत आढळली ज्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते.

