

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्याकडे चार, पाच तरुण एकत्र आले की वेगवेगळ्या विषयांवर गप्पा होतात. या गप्पा कधी राजकीय असतात. तर कधी व्यवसाया संदर्भात असतात. आपण सगळ्यांनी मिळून एखादा व्यवसाय सुरु करावा अस सगळ्यांना वाटत असतं. नोकऱ्या करण्यापेक्षा व्यवसाय बरा म्हणत मित्र मिळून व्यवसाय करतात. असाच एक किस्सा आहे. महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षाध्यक्षांनी मिळून एक व्यवसाय सुरु केला होता, पण हा व्यवसाय त्यांना काही दिवसातच बंद करावा लागला होता. हे दोन राजकीय नेते म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे.
महाराष्ट्रातील या दोन दिग्गज नेत्यांनी मिळून एक व्यवसाय सुरु केला होता. पण तो व्यवसाय काही दिवसातच बंद करावा लागला होता. स्व. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची घट्ट मैत्री देशाने पाहिली आहे. पण त्यांची व्यवसायातील पार्टनरशीप काही जास्त दिवस टीकली नाही.
दिवस होता १६ जून १९६६ चा
बी. के. देसाई यांनी खासदार शरद पवार यांची भेट बाळासाहेबांसोबत शिवतीर्थावर करुन दिली. त्या दिवशी शिवतीर्थावर शिवसेनेची सभा होती. शरद पवार तेव्हा युथ काँग्रेसचे काम करत होते. बी के देसाई, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे या तिघांत अजुन एक मित्र सामिल झाला. त्यांच नाव शशीशेखर बेदक.
चार जणांची मैत्री पुन्हा घट्ट झाली. रोज त्यांची भेट होऊ लागली. वेगवेगळ्या विषयावर चर्चा होऊ लागली. या चर्चेत त्यांनी एकदा व्यवसायावर चर्चा सुरु झाली. काहीतरी व्यवसाय आपण चौघांनी मिळून केला पाहिजे अशा चर्चा सुरु झाल्या.
पुढं काही दिवसांनी शशीशेखर बेदक यांनी व्यवसायाची कल्पना सुचवली. आपण अमेरिकेतून निघणाऱ्या टाईम मॅगझिनच्या तोडीचं एक मासिक सुरु करुया. ही कल्पना त्यांनी तिघांसमोर मांडली. सगळ्यांनी या कल्पनेला दुजोरा दिला. भाषा मराठी असेल पण माहिती जगभरातील देऊया अस या चौघांच ठरलं.
या मासिकेला काय नाव द्यायचं यावरती चर्चा सुरु झाल्या. पुढं नावही ठरलं. त्या मासिकेला नाव दिलं 'राजनिती'. या मासिकेचं बजेट फायनलं केलं. चौघांनी पैसे काढून ते जमाही केले. व्यवसाया विषयी नियोजन सुरु झाले. कोमी काय करायचं. अंक कसा निघाला पहिजे. या सगळ्याच नियोजन झालं.
नव्या व्यवसायाचे नियोजन सुरु होते. शरद पवार, बाळासाहेब ठाकरे, बी. के. देसाई, शशीशेखर बेदक हे चौघेही इंटरेस्ट घेऊन मासिक सुरु करायचं म्हणून प्रयत्न करत होते. नवरात्रीचे दिवस सुरु होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या एक भगिनी आल्या होत्या. नवरात्रीच्या दिवसात त्यांच्या अंगात देवीचा संचार व्हायचा. अंगात देवी आल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरे द्यायच्या. हे सगळं पाहून आपल्या अंकाविषयी विचारावं म्हणून त्यांनी अंकाचे भविष्य काय असेल कधी सुरु करु या सगळ्या गोष्टी विचारल्या.
यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनींनी अंक प्रकाशनासाठी एक तारीख सांगितली. मासिकाची पहिली प्रत सिध्दीविनायका समोर ठेवा. तसेच मासिकेला उज्जव भवितव्य असून एकही प्रत बाजारात शिल्लक राहणार नाही, अस त्यांनी सांगितले. पण पुढं झालं अस अंक बाजारात खपलाच नाही. त्यामुळे शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हा व्यवसाय बंद केला. जसं बाळासाहेबांच्या भगिनींनी भविष्य सांगितलं होतं तसंच झालं. पुढं बाजारात अंक दिसलाच नाही. खासदार शरद पवार यांनी हा किस्सा त्यांच्या आत्मचरित्रात सांगितला आहे.