

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिधी येथील एका आदिवासी तरुणावर लघुशंका केल्याचे प्रकरणउघडकीस आले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे नाव प्रवेश शुक्ला असे नाव आहे. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री त्यांना अटक करण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार (NSA) ही कारवाई करण्यात येणार आहे. शुक्ला यांच्या घरावर आज प्रशासनाकडून बुलडोझर चालवत कारवाई करण्यात आली आहे.
शुक्ला यांच्या कच्च्या घरासह भिंत पाडून ही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी साकेत मालवीय यांनी याबाबतचे आदेश जारी केले होते. त्यानसार संबंधित भाजप नेत्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. आरोपींना रीवा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात येणार आहे. NSA अंतर्गत एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई करताना बुलडोझरची कारवाई केली जाईल, मात्र त्यांनी जर एखादे अतिक्रमण केले असेल तेव्हाच कारवाई केली जाईल, अशी राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी माध्यमाशी बोलताना दिली होती. (Sidhi viral video)
आदिवासी तरुणावर लघवी करणारा युवक नेता हा राजकीय क्षेत्रातील असल्याने या प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. संशयित आरोपी प्रवेश शुक्ला हे केदार शुक्ला यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या आदिवासी तरुणावर लघुशंकेच्या प्रकरण तापल्यानंतर भाजप आमदार केदार शुक्ला यांनी प्रवेश हा आपला प्रतिनिधी नसल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सिधी जिल्ह्यातील व्हायरल व्हिडिओची दखल घेत दोषीला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, अशा सूचना दिल्या आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. तसेच दोषीवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) देखील लावला जाईल असे सांगण्यात आले.
हेही वाचा