Devendra Fadnavis : भाजप मित्रपक्षाला कधीही धोका देत नाही : देवेंद्र फडणवीस

File Photo
File Photo
Published on
Updated on

ठाणे : पुढारी वृत्तसेवा: भाजप मित्र पक्षांना कधीही धोका देत नाही, बिहारमध्ये भाजपचे ७५ आणि जेडीयूचे ४२ सदस्य निवडून आल्यानंतरही नितीशकुमार यांना मुख्ययमंत्री पद दिले. महाराष्ट्रातही शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे खरी शिवसेना आता आमच्यासोबत आली असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. बुधवारी (दि.१०) ठाण्यात एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सुशील मोदी यांच्या विधानचे देखील समर्थन केले.

(Devendra Fadnavis) राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला. यामध्ये शिवसेना ९ तर भाजपच्या ९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र अद्याप या मंत्र्यांना खाटेपावत करण्यात आलेले नाही. मात्र प्रसारमाध्यमांनी आधीच खातेवाटप केले असून प्रसार माध्यमांनी केलेले खातेवाटप सपशेल चुकीचे ठरेल, असे फडणवीस यांनी सांगितले. भाजपचे नेते सुशील मोदी यांच्या विधानाचेही समर्थन फडणवीस यांनी केले आहे. भाजप मित्र पक्षांना कधीच धोका देत नाही. मात्र जे मित्रपक्ष भाजपला धोका देतात. त्यांचे काय होते, असे विधान सुशील मोदी यांनी केले होते. यावर फडणवीस यांनी बिहार आणि महाराष्ट्राचे उदाहरण दिले.

बिहारमध्ये भाजपचे ७५ तर जेडीयुचे ४२ सदस्य निवडून आले. तरीही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद दिले. बिहारमध्ये आज सरकार गेले असले, तरी ते पुन्हा येईल, त्यात काय असे ते म्हणाले. केवळ बिहारचे उदाहरण देऊन फडणवीस थांबले नाही, तर महाराष्ट्रामध्येही शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यामुळेचा आता खरी शिवसेना आमच्याबरोबर असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी ठाण्यातील गजानन महाराज चौकात हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रथाचे उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Devendra Fadnavis : शरद पवारांचे दुखणे वेगळे आहे …

शरद पवार यांचे दुखणे वेगळे आहेत, आणि ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे आहे असा टोला फडणवीस यांनी शरद पवार यांना देखील लगावला आहे. ज्यावेळी पवार यांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते, कोणालाही कसाही पक्ष बदलता येत होता. आज कायदे तयार झालेले आहेत, त्यामुळे कायदेशीर लढाई लढावी लागत आहे आणि एकनाथ शिंदे तेच करत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news