UP: मेरठमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, चार ठार, अनेक जखमी, तीन घरांची पडझड, मदतकार्य सुरू
पुढारी ऑनलाईन : मेरठमध्ये आज (मंगळवार) सकाळी एका घरात सुरू असलेल्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या स्फोटात हा परिसर हादरून गेला. या स्फोटात चार लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये चार मुलांसहित दहापेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत.
मेरठच्या लोहियानगर स्थित एका घरात सुरू असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला. यामुळे हा परिसर हादरून गेला. हा स्फोट इतका मोठा होता की, आजुबाजुच्या इमारतीही कोसळल्या. या दुर्घटणेत चार लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार घटनास्थळी फटाक्याच्या कारखान्यासारखी कोणतीही गोष्ट दिसत नसून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साबन विखुरलेल्या स्वरूपात दिसून आला आहे.
या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. हा स्फोट इतका मोठा होता की ज्यामुळे ३३ केवीच्या लाईन असलेला विजेचा खांब देखील तुटून पडला आहे. या परिसरातील ३ ते ४ किमी पर्यंतच्या इमारती, घरांचे या स्फोटात नुकसान झाले आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असून, घटनेचा तपास केला जात आहे.
हेही वाचा :

