

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bharat Jodo Yatra : रिझर्व बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले. काँग्रेसने त्यांच्या ट्विटरवर ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी राहुल गांधींसोबत रघुराम राजन यांचा फोटो शेअर शेअर केला आहे.
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमधून जात आहेत. राजस्थानमध्ये यात्रेचा आज दहावा दिवस आहे. ही यात्रा बामनवास विधानसभा सीटच्या अंतर्गत येणा-या भदोती गावातून सुरू झाली.
Bharat Jodo Yatra : रघुराम राजन हे आज बुधवारी सकाळी थोड्या वेळासाठी या यात्रेत सहभागी झाले. काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवर याबाबत म्हटले आहे की, "आरबीआयचे माजी गव्हर्नर श्री रघुराम राजन राहुल गांधी यांच्यासह पावले उचलत आहेत. द्वेषाच्या विरोधात देशाला एकत्र आणण्यासाठी उभ्या राहिलेल्या लोकांची वाढती संख्या हे दर्शवते की आपण यशस्वी होऊ."
ही यात्रा आज 25 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. पहिल्या ब्रेकनंतर यात्रा दौसा जिल्ह्यात प्रवेश करेल आणि बगडी गावात थांबेल. दौसा प्रदेश पाचवा जिल्हा असणार जिथे भारत जोडो यात्रा प्रवेश करेल.
मुख्यमंत्री अशोक गहलोतसह काँग्रेसचे अन्य मोठे नेते यात्रेत सहभागी झाले आहेत. गोविंद दोतासरा, सचिन पायलट आणि इतर नेते आज राहुल गांधींसोबत सामील झाले आहेत. राहुल गांधी आज बागडी गावात एका सभेला संबोधित करणार आहेत.
तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी भारत जोडो यात्रा सुरू झाली असून तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश असा प्रवास करीत ही यात्रा सध्या राजस्थानात पोहोचली आहे. 21 डिसेंबरपर्यंत ही यात्रा राजस्थानमध्ये 500 किलोमीटरचा प्रवास करून हरियाणामध्ये प्रवेश करेल. आतापर्यंत ज्या राज्यांमधून भारत जोडो यात्रा गेली आहे त्यापैकी राजस्थान हे एकमेव राज्य आहे जिथे काँग्रेसचे सरकार आहे.
दरम्यान, आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, आातापर्यंत अनेक सेलिब्रिटी तसेच उच्च पद्स्थ व्यक्तींनी भारत जोडो यात्रेत थोड्या वेळासाठी उपस्थिती नोंदवली आहे. त्यांच्या प्रमाणेच रघुराम राजन हे देखील एक असू शकतात. त्यामुळे राजन हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का नाही ही सध्या तरी फक्त चर्चाच आहे.