![सीडी प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे द्या : आ. रमेश जारकीहोळी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F02%2F%E0%A4%86.-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : आपल्या विरोधात रचण्यात आलेल्या सीडी प्रकरणाच्या षडयंत्रामागे डी. के. शिवकुमार यांचा हात आहे. अत्यंत खालच्या पातळीला जाऊन आपल्या विरोधात कारस्थान करण्यात आले आहे. याबाबतचे पुरावे आपल्याकडे असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आ. रमेश जारकीहोळी यांनी केली.
येथील एका हॉलटेमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, सीडी प्रकरणातील धागेदोर हाती लागले आहेत. त्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी आपण केली आहे. आपल्याकडे अनेक पुरावे ते काळा पैसा जमविण्यात आला आहे. डीकेशि यांच्याबरोबर घनिष्ठ संबंध असतानाही आपल्याविरोधात षडयंत्र रचण्यात आले आहे. आपले राजकीय जीवन संपविण्याचा घाट घालण्यात आला आहे. अशाच प्रकारे राज्यातील अनेक नेत्यांना व अधिकाऱ्यांना सत्य बाहेर येईल, असे ते म्हणाले.
राणी चन्नम्मा यांच्या विरोधात आपण काहीच आक्षेपाई बोललेलो नाही. काही जणांनी ऑडिओ एडीट करुन आपल्या विरोधात अपप्रचार चालविला असल्याचेही आ. जारकीहोळी यांनी सांगितले.