बेळगावच्या उद्योजकाची ३८ लाखांची फसवणूक; लष्करी अधिकाऱ्यांचे नाव सांगून घातला गंडा

बेळगावच्या उद्योजकाची ३८ लाखांची फसवणूक; लष्करी अधिकाऱ्यांचे नाव सांगून घातला गंडा

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा ;  लष्करी अधिकाऱ्यांना उच्च सुरक्षा असलेल्या बिनची आवश्यकता असल्याचे सांगून ती बनवण्यासाठी अनामत रकमेच्या नावाखाली बेळगावच्या कंपनीची ३८ लाखांची फसवणूक झाली आहे. त्याबद्दल सीईएन पोलिसांत वेगा एव्हिएशन कंपनीचे सुहास चिंडक यांनी तक्रार केली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या महितीनुसार, उद्यमबाग येथील वेगा एव्हीएशन कंपनीचे मालक सुहास चिंडक यांना फोनवरून संपर्क साधण्यात आला. आपण सैन्यदलातून मेजर कुलदीपसिंग बोलत आहे. सैन्य दलातील अधिकाऱ्यांना सिक्युरिटी केबिनची आवश्यकता आहे. ती केबिन आपल्या कंपनीकडून (वेगा कंपनी) बनवून हवी आहे, असे चिंडक यांना सांगण्यात आले.

त्यानंतर संपर्क साधलेल्या व्यक्तीने केबिनची ऑर्डर देण्यासाठी सैन्य दलाच्या काही अटी आहेत, त्यांची पूर्तता करावी लागेल असे सांगितले. कामाची वर्क ऑर्डर मिळविण्यासाठी आधी अनामत रक्कम (डिपॉझिट) ठेवावी लागेल, त्यानंतरच कामाची ऑर्डर मिळेल, असेही त्या व्यक्तीने सांगितले. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर अनामत रक्कम व केबिन बनवण्याची कंत्राट रक्कम एकत्र परत देण्यात येईल, असे सांगून सैन्य दलाच्या सात बँक खात्यांवर ही रक्कम जमा करावी लागेल, अशी बतावणी केली. फोन करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवून चिंडक यांनी अनामत रक्कम जमा करण्याची तयारी केली.

त्यानंतर चिंडक यांनी आपल्या कंपनीचे फायनान्स अधिकारी श्रीकांत नगारे यांना कथित लष्करी खात्यावर अनामत रक्कम जमा करण्याची सूचना केली. त्यानुसार नगारे यांनी गेल्या ११ जानेवारी २०२३ रोजी मेजर कुलदीप सिंग यांच्या नावे असणाऱ्या ७ बँक खात्यांवर एकूण ३८ लाख ७९ हजार रुपये वर्ग केले. तथापि, ही रक्कम जमा झाल्यानंतर कथित कुलदीप सिंगने संपर्क बंद केला. चिंडक यांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल बंद येऊ लागा. आपण फसलो गेलो असल्याचे लक्षात येताच चिंडक यांनी सीईएन पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. सीईन पोलिस अधिक तपास करीत आहेत.

एक नजर

लष्करात मेजर असल्याची बतावणी करून साधला संपर्क
वेगा कंपनीला केबिन बनण्याचे काम देण्याची तयारी
मात्र त्यासाठी अनामत रक्कम जमा करण्याची सूचना
विश्वास ठेवून वेगा कंपनीकडून
अनामत रक्कम जमा
रक्कम जमा झाल्यानंतर कथित अधिकाऱ्याचा फोन बंद

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news