बेळगाव : सोळा दुचाकी जप्त, चौघांना अटक

बेळगाव : सोळा दुचाकी जप्त, चौघांना अटक
Published on
Updated on

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा रायबाग व संकेश्वर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवायात सोळा दुचांकीसह चौघांना अटक केली. या संशयितांनी रायबाग, अथणी, इंगळगी, सप्तसागरसह परिसरातील दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले आहे.

निंगाप्पा नामक तरुण दोन दिवसांपूर्वी नंबर प्लेट नसलेली दुचाकी घेऊन रायबाग शहरात फिरत होता. संशयावरून त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याचे आढळून आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने दहा दुचाकी चोरल्याचे
समोर आले. रायबाग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे.

संकेश्वर पोलिसांकडून सहा दुचाकी जप्त संकेश्वर पोलिसांनी सहा दुचाकी जप्त करून तिघांना अटक केली आहे. हे तिघेजण बेळगावहून निपाणीकडे नंबर प्लेट नसलेली दुचाकी घेऊन निघाले होते. महामार्गावरील एका धाब्याजवळ निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी त्यांना संशयावरुन अडविले. यावेळी तिघांनी सहा दुचाकी चोरल्याचे स्पष्ट झाले. संकेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news