बेळगाव : शेतातून 25 किलो गांजा जप्त

बेळगाव : शेतातून 25 किलो गांजा जप्त

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा : रायबाग तालुक्यातील कुडचीजवळील निलजी येथील शेतातून 25 किलो ओला गांजा जप्त केला. याची किंमत 50 हजार रू. होते. या प्रकरणी हणमंत संतराम अक्केन्नवर (वय 45, रा. सुट्टट्टी, ता. रायबाग) याला अटक केली.

कुडची ठाण्याच्या हद्दीतील निलजी येथील उसात गांजाचे पिक घेतल्याची माहिती उपनिरीक्षक शिवराज धरीगोण यांना मिळाली. त्यांनी सहकार्‍यांसह जाऊन येथे छापा टाकला असता उसाच्या शेतात मधोमध लावलेला गांजा आढळून आला.

अथणीचे उपअधीक्षक श्रीपाद जल्दे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकला. उपनिरीक्षक वाय. एम. हलकी, सहायक उपनिरीक्षक के. आर. साळुंके, हेड कॉन्स्टेबल एम. के. खनदाळ, पी. एल. खवटकोप्प, जी. एन. इंचल, एस. ए. पाटील, अरिफ मुदनाळ, आनंद पुजारी, पी. डी. चौहाण, शिवपुत्र पुजारी, एस. डी. मेत्री, पी. ए. गड्डेकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news