बेळगाव : बिजगर्णीत भरदिवसा घरफोडी

बेळगाव : बिजगर्णीत भरदिवसा घरफोडी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे भरदिवसा करून 54 हजारचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. याप्रकरणी वडगाव ग्रामीण पोलिस स्थानकात नोंद झाली आहे. कल्लापा भास्कळ यांच्या घरी ही चोरीची घटना घडली.

कल्लाप्पा कुटुंबीयांसमवेत शेताला गेले होते. दरम्यान, दुपारी 12 वाजता मागील दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील 54 हजार घेऊन पोबारा केला. भरदिवसा घरफोडी झाल्याने ग्रामस्थांतून भीती व्यक्त होत आहे. ग्रामीन भागात होत असलेल्या चोरीच्या घटनांचा तपास लावणे पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.

यापूर्वीही अनेक चोरीच्या घटना घडल्या आहेत. यातील चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नसल्याने चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. पोलिसांनी विशेष मोहीम राबवून चोरट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news