बेळगाव : बकरी चोरणार्‍याला अटक, रकमेसह टेम्पो जप्त

बेळगाव : बकरी चोरणार्‍याला अटक, रकमेसह टेम्पो जप्त

बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा बकरी तसेच अन्य वस्तू चोरणार्‍या चोरट्याला मुरगोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून टेम्पोसह रोकड जप्त केली. अशोक बसाप्पा मदमागेत्री (वय 26, रा. खानापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी मुरगोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हलकी क्रॉस येथून 30 बकर्‍या चोरीला गेल्याची नोंद मुरगोड पोलिसांत झाली होती. उपरोक्त संशयिताला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने बकर्‍या चोरून विकल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून बकरी विकून आलेल्यापैकी लाखाची रक्कम व व टेम्पो जप्त केला. त्याच्याविरोधात मुरगोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

रामदूर्गचे उपअधीक्षक राम नगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे उपनिरीक्षक वसंत नेर्ली, लक्ष्मी बिरादार व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news