बेळगाव
बेळगाव : पिपाणीवरून मारहाण; तिघांना अटक
बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा : गणेशोत्सव मिरवणूक काळात कर्णकर्कश पिपाणी वाजवणार्याला तिघांनी दम दिला. परंतु त्याला का दम देताय, अशी विचारणा करणार्या तरुणाला तिघांनी मारहाण केली. सोमवारी मार्केट पोलिसांनी त्यांना अटक केली. प्रथमेश नारायण गणीकोप्प (21), विनायक शरणबसाप्पा अमाणे (22) व प्रशांत श्रीकांत आमरसकर (24, तिघेही रा. शास्त्रीनगर) अशी संशयितांची नावे आहेत.
सूरजकुमार नागेश वेर्णेकर (वय 40, रा. महांतेशनगर) यांनी मार्केट पोलिसांत फिर्याद दिली होती. उपनिरीक्षक विठ्ठल हावन्नवर यांनी याचा तपास करून तिघांना अटक केली.

