बेळगाव : तोडणी मिळण्यासाठी उसाची होळी; एकरी ६ ते ७ टन वजनात घट

बेळगाव : तोडणी मिळण्यासाठी उसाची होळी; एकरी ६ ते ७ टन वजनात घट

कारदगा : पुढारी वृत्तसेवा ;  वर्षभर काबाडकष्ट करून पिकविलेल्या उसाला वेळेत तोडणी मिळत नसल्याने ऊस वाळत असून शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. वर्षभर कष्ट करून उसाला तोडणी वेळेत मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे शेतकरी नाईलाजाने उसाची होळी करत असून, एकरी ६ ते ७ टन वजनात घट सहन करत आहेत.

सध्या उसाला बऱ्यापैकी दर मिळू लागल्याने आथिष्टदृष्ट्या विकास साधण्यासाठी बहुतांश शेतकरी उसाचे पीक घेत आहेत. पण आता दिवसेंदिवस ऊस शेतीही शेतकऱ्यांना अडचणीची ठरू लागली आहे. गळीत हंगामातील ऊसतोडीचा शेवट करताना मजूर आपल्या सोयीसाठी उभे ऊस पीक पेटवून गळीतास पाठवत आहेत.

ऊसतोड मजूर ऊस पेटविल्याशिवाय तोडणार नाही, अशी ताठर भूमिका घेत असल्याने शेतकरी हतबल होऊन संमती देत आहेत. त्यामुळे होळी सणाअगोदरच उसाची होळी गावोगावी दिसत असल्याचे दिसत आहे. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे.

बळीराजा चिंताग्रस्त

फेब्रुवारीपासूनच उन्हाच्या झळा अधिकच जाणवू लागल्या आहेत. १६ महिन्यांचा कालावधी उलटूनही उसाला तोड मिळत नसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. तोडणीसाठी ऊस पेटवत असल्याने वजनातही घट होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news