बेळगाव : जानेवाडीत शॉर्ट सर्किटने गवतासह ट्रॅक्टर ट्रॉली भस्मसात

बेळगाव : जानेवाडीत शॉर्ट सर्किटने गवतासह ट्रॅक्टर ट्रॉली भस्मसात
Published on
Updated on

किये : पुढारी वृत्तसेवा : गवताची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला शार्ट सर्किटमुळे आग लागल्याची दुर्घटना घडली. जानेवाडी येथील शिवारात रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये गवतांसह ट्रॅक्टर, ट्रॉली जळून भस्मसात झाली. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

नावगे येथील शेतकरी यल्लापा तरवाल हे ट्रॅक्टर व दोन ट्रॉली घेऊन जानेवाडी शिवारात गवत आणायला गेले होते. दोन्ही ट्रॉलीमध्ये गवत भरून नावगेकडे येत असताना शिवारातून गेलेल्या विद्युत भारीत तारांचा गवताला स्पर्श झाला. त्यावेळी आगीच्या ठिणग्या पडल्याने ट्रॅक्टरसह ट्रॉली व गवताने पेट घेतला. सदर घटना अचानक घडली. गवताने लागलीच पेट घेतली. ट्रॅक्टर चालकाने प्रसंगावधान राखून ट्रॅक्टर इंजिन ट्रॉलीपासून वेगळा केल्याने मोठी हानी टळली.

जानेवाडी येथील रामचंद्र गुरव यांची गवत गंजी बाजूला होती. तिनेही पेट घेतल्याने एकूण तीन ट्रॉली गवत व दोन ट्रॉली जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जानेवाडी येथील नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केल. मात्र शेतवडीतील अरुंद रस्त्यामुळे गाडी आगीच्या ठिकाणी पोहोचण्यात अडथळा निर्माण झाली. यामुळे किणये येथील पाण्याचे टँकर बोलावून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news