

खडकलाट : पुढारी वृत्तसेवा : विद्युत वाहिनी तुटून पडल्याने शॉर्टसर्किट होऊन गळतगा येथील उसाच्या फडास आग लागली. या घटनेत सुमारे अडीच एकरातील ऊस जळून खाक झाला असून सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गळतगा येथील बसस्थानकाजवळ सुभाष अण्णाप्पा मुकरे यांचे शेत असून त्यांच्या दोन एकर उसाला व शिवानंद दत्तू गिंडे यांच्या शेतातील ऊस पिकास शॉर्टसर्किटने आग लागून नुकसान झाले. ग्रा. पं. सदस्य आलगोंडा पाटील व अक्षय बेरूडे हे शेतातील विद्युत मोटार सुरू करण्यासाठी जात असताना ही घटना लक्षात आली.
त्यांनी तात्काळ संबंधित शेतकर्यांना माहिती दिली. त्यानंतर शेतकर्यांनी शेताकडे धाव घेतली. पण तोपर्यंत ऊस जळून गेला होता. शेतकर्याला मदत देण्याची मागणी होत आहे.