प्रकाशोदय-अरुणास्त

प्रकाशोदय... अरुणास्त!
प्रकाशोदय... अरुणास्त!
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या वायव्य शिक्षक मतदारसंघाच्या चुरशीने झालेल्या निवडणुकीत माजी खासदार, माजी राज्य मंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार प्रकाश हुक्केरी यांनी भाजपवर मात केली. विद्यमान आमदार आणि भाजप उमेदवार अरुण शहापूर यांचा त्यांनी 5 हजार 55 मतांनी पराभव करून पहिल्यांदाच विधान परिषदेत एंट्री केली. त्यामुळे शहापूर यांची हॅट्ट्रिक मात्र हुकली. विजयानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. पदवीधर मतदारसंघात मात्र भाजपने आघाडी घेतली होती, पण रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर झालेला नव्हता. या मतदारसंघातून चौथ्या फेरीअखेर भाजपचे हनुमंत निराणी, काँग्रेसचे उमेदवार सुनील संक यांच्यापेक्षा 21,456 मतांनी आघाडीवर आहेत. आणखी तीन फेर्‍यांची मोजणी शिल्लक होती.

शिक्षक मतदारसंघासाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र खरी लढत काँग्रेसचे प्रकाश हुक्केरी आणि भाजपचे अरुण शहापूर यांच्यातच होती. काँग्रेस आणि भाजपच्या वतीने जोरदार प्रचार मोहीम राबवण्यात आली होती. प्रचाराच्या निमित्ताने दोन्ही पक्षांच्या राज्यस्तरीय नेत्यांनी भेटी दिल्या असल्यातरी कार्यकर्त्यांनी मतदारांच्या वैयक्‍तिक गाठीभेटीवर भर दिला होता. यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. सोमवारी घेण्यात आलेल्या मतदानात वायव्य शिक्षक मतदारसंघामध्ये एकूण 25 हजार 386 मतदारांपैकी 21 हजार 401 मतदारांंनी आपल्या मतदानाचा हक्‍क बजावला होता.

बुधवारी सकाळी साडे आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. प्राधान्यक्रमानुसार मतमोजणी होत असल्यामुळे तब्बल दहा तास मतमोजणी चालली. प्रकाश हुक्केरी यांनी 11 हजार 460 मते मिळविली तर प्रतिस्पर्धी शहापूर यांना 6 हजार 405 मते मिळाली.
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून प्रकाश हुक्केरी यांनी आघाडी घेतली होती. दुसर्‍या फेरीमध्ये निकालाचा कौल लक्षात आल्यानंतर अरुण शहापूर मतमोजणी केंद्रातून निघून गेले. यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला. चिकोडी तालुक्यातील एकसंबा हे मूळ गाव असणारे प्रकाश हुक्केरी यांच्या विजयाची चाहूल लागताच त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली.

बेळगावकडे येत असताना अनेक गावात त्यांच्यावर फुलांचा वर्षाव झाला, गावातून मिरवणुका काढल्या गेल्या. त्यामुळे त्यांना चिकोडीतून बेळगावला मतमोजणी केंद्रात येऊन प्रमाणपत्र स्वीकारण्यास उशीर झाला. रात्री आठच्या सुमारास त्यांनी ज्योती कॉलेजमध्ये मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन प्रादेशिक आयुक्‍त अमलान अदित्य बिस्वास यांच्याकडून प्रमाणपत्र स्वीकारले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेस नेते आ. सतीश जारकीहोळी,
आ. लक्ष्मी हेब्बाळकर आदी उपस्थित होते.

चंद्रशेखर लोणी       निजद           544
श्रीनिवासगौडर       अपक्ष            524
श्रेणीक जंगटे          अपक्ष             8
सी. संगमेश           अपक्ष              4
आप्पासाहेब कुरणे  अपक्ष             9
चंद्रशेखर गुडशी    अपक्ष             101
राजाराम देसाई      अपक्ष             10
बसाप्पा मणीगार     अपक्ष            39
श्रीकांत पाटील        अपक्ष            19

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news