जवान शंकर यलीगार यांच्यावर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार

जवान शंकर यलीगार यांच्यावर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार
Published on
Updated on

गोकाक ः पुढारी वृत्तसेवा गोकाक तालुक्यातील मेलमट्टी येथील जवान शंकर बाळप्पा यलीगार (वय 33) याच्यावर सरकारी इतमाात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मेलमट्टी येथील जवान शंकर बाळप्पा यलिगार यांचे औरंगाबाद येथे सेवा करत असताना हृदयविकाराने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव
बुधवारी सकाळी मूळगावी मेलमट्टी येथे आणण्यात आले. पार्थिव गावात दाखल होताच कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटणार होता.

गावातील प्राथमिक शाळा आवारात अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात आले होते. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती. बेळगावचे अतिरिक्त पोलिस प्रमुख एम. बी. नंदगावी व डीआरएसपी कारयप्पन्नवर यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

गावातील प्रमुख मार्गावरून सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. अग्रभागी जवानासह 50 पेक्षा अधिक पोलिस सहभागी झाले होते. यावेळी अमर रहे अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या. जवान शंकर यलीगार यांच्या पत्नीकडे तिरंगा ध्वज अर्पण करण्यात आला. जवान व पोलिस दलाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना
दिली. अंत्ययात्रेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news