कर्नाटकासह 13 राज्यांत छापे; पीएफआयवर एनआयएची कारवाई

कर्नाटकासह 13 राज्यांत छापे; पीएफआयवर एनआयएची कारवाई
Published on
Updated on

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास पथकाने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) कार्यालये आणि कार्यकर्त्यांच्या निवासांवर एकाचवेळी छापे घालून तपास केला. ही कारवाई कर्नाटकासह 13 राज्यांमध्ये एकाच वेळी करण्यात आली. या कारवाईमध्ये 106 जणांना अटक करण्यात आली आहे. काही ठिकाणी एसडीपीआय कार्यकर्त्यांच्या निवासावर आणि कार्यालयांवरही छापे घालण्यात आले असून, महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली.

रिचमंड रस्त्यावरील निवास आणि कार्यालयात तपास करण्यात आला. पीएफआयचे राष्ट्रीय सचिव मोहम्मद साकिब, पादरायनपूर येथील पीएफआयचे राज्याध्यक्ष नासीर पाशा, पुलकेशीनगर, केजी हळ्ळी आणि डी.जे. हळ्ळीत राहणार्‍या संघटनेच्या इतर पदाधिकार्‍यांच्या नवासांवर एनआयएने छापे घातले.

काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने छापे घातले होते. त्यावेळी पीएफआयला कोट्यवधी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचे समोर आले होते. विदेशातून पैसे पाठवण्यात येत असल्याचेही तपासात दिसून आले होते. त्यानंतर संघटनेच्या हालचालींवर नजर ठेवण्यात आली होती. संघटनेच्या खात्यावर जमा होणार्‍या देणग्यांबाबत संशय व्यक्त करण्यात आला होता. या रकमेच्या चौकशीसाठी छापे घालण्यात आल्याची माहिती एनआयएच्या अधिकार्‍यांनी दिली.

दहशतवादी कृत्यांसाठी आर्थिक मदत, बेकायदा शस्त्रास्त्र प्रशिक्षण, संघटनेत सहभागी होण्यासाठी भावना भडकावणे असे अनेक गंभीर आरोप पीएफआयवर आहेत. याबाबत चौकशीसाठी एनआयएने छापे घालून तपास सुरू केला आहे. संघटनेचे पदाधिकारी इजाज अली यांच्या निवासात बेहिशेबी 14 लाख रुपये जप्त करण्यात आले. म्हैसुरातील शांतीनगरात पीएफआयचे नेते मौलाना मोहम्मद खलीमुल्ला यांना ताब्यात घेऊन एनआयए अधिकार्‍यांनी काही तास चौकशी केली. त्यांनाही बंगळूरला नेण्यात आले.

विभागीय अध्यक्ष खान ताब्यात

पीएफआय संघटनेचे राज्य विभागाचे अध्यक्ष शाहीद खान यांना शिमोगा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पहाटे 2 वाजता त्याच्या निवासावर एनआयएने छापा घतला. सकाळी 6 पर्यंत तपास करून शाहीद यांना ताब्यात घेण्यात आले. ते शिमोगा, चित्रदुर्ग, दावणगिरी, चिक्कमगळूर, हावेरी विभागाचे अध्यक्ष आहेत. पीएफआय शिमोग्याचे माजी जिल्हाध्यक्ष इमामुद्दिन यांच्या निवासावर गुरुवारी सकाळी छापा घालण्यात आला. त्यांना ताब्यात घेऊन बंगळूरला नेण्यात आले.

पीएफआय, एसडीपीआयवर बंदीची प्रक्रिया : ज्ञानेंद्र

बंगळूर : वारंवार दहशतवादी कृत्यांसाठी सहकार्य करणार्‍या पीएफआय आणि एस.डी.पी.आय. संघटनांवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची प्रक्रिया केंद्र सरकारी पातळीवर सुरू झाल्याची माहिती गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी दिली. येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दोन्ही संघटना केवळ कर्नाटकातच नव्हे तर देशातील विविध ठिकाणी विध्वंसक कृत्यांमध्ये सहभागी होत असल्याचे काही पुरावे मिळाले आहेत. या संघटनांनी दहशतवादी संघटनांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी घातली जाणार आहे.

तपास संस्थांनी संघटनांच्या हालचालींवर नजर ठेवली आहे. छापे घालून तपास सुरू केला आहे. तपास करताना जात, धर्म पाहिला जात नाही. काहीजणांकडून विशिष्ट धर्मातील लोकांना लक्ष्य बनवण्यात आल्याचा आरोप होण्याची श???ता आहे. पण, त्याआधीच हे स्पष्टीकरण देत आहे. दोन्ही संघटना वादग्रस्त बनत चालल्या आहेत. त्यांना आर्थिक मदत मिळत आहे. त्यांना मिळणार्‍या आर्थिक मदतीची माहिती घेतली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news