

बेळगाव : पुढारी वृसेवा : कर्नाटक महाराष्ट्र बससेवा शुक्रवार दि. ९ पासून सुरू होणार असल्याची माहिती परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे. मंगळवारपासून महाराष्ट्र महामंडळाच्या आगारात थांबून राहिलेल्या २३१ बस गुरुवारी मध्यरात्री महाराष्ट्रात रवाना झाल्या. महाराष्ट्रात अडकलेल्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसदेखील राज्यात म्हणून दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी 'लालपरी'ची एंट्री कर्नाटकात होणार आहे.
गुरुवारी कर्नाटकातून महाराष्ट्रात २०० हून अधिक बस प्रवासी घेऊन रवाना झाल्या शुक्रवारपासून कर्नाटकात महाराष्ट्राची परिवहन लालपरी दाखल होणार आहे. तीन दिवस दोन्ही राज्यांतील बससेवा सीमेपर्यंत धावत होत्या. दोन्ही सीमेवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. परिवहन मंडळाच्या बसचे नुकसान होऊ नये दोन्ही राज्यातील आगारातच पोलिस बंदोबस्तात बसना संरक्षण देण्यात आले होते. त्यामुले परिवहन मंडळाचे नुकसान झाले नाही. महाराष्ट्रातून दररोज ६०० बस कर्नाटकात येतात तर कर्नाटकातून १,२३० बस प्रवासी घेऊन महाराष्ट्रात जातात. त्यामुळे दोन्ही परिवहन महामंडळाचे तीन दिवसात कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.